Bank Holidays in December 2020 | बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद

बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच बँकांच्या सुट्ट्यांबद्दल जाणून घ्या. Bank Holidays December 2020 Bank Will Be Closed For So Many Days In December This Day Will Work

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:12 PM, 30 Nov 2020
Bank Holidays
लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मोदी सरकारने (Modi Government) तीन हप्त्यांमध्ये ग्राहकांच्या जनधन खात्यात (Jan Dhan Accounts) 1,500 रुपये टाकले होते. तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे.

नवी दिल्लीः वर्ष 2020च्या शेवटच्या महिन्यात बँकांना बर्‍याच सुट्ट्या मिळणार आहेत. जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे अनेक बँक ग्राहकांच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Bank Holidays December 2020 Bank Will Be Closed For So Many Days In December This Day Will Work)

देशातील सर्व बँकांना ही 14 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. आपल्याकडेही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच बँकांच्या सुट्ट्यांबद्दल जाणून घ्या.

3 डिसेंबरपासून सुट्ट्या सुरू होणार
बँकांच्या सुट्ट्या 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यात कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची सुट्टी असेल. 3 डिसेंबरनंतर 6 तारखेला रविवारी असल्याने देशभरात बँकेची साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 डिसेंबर हा डिसेंबरचा दुसरा शनिवार असल्याने बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच रविवारी 13 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल.

17, 18 19 रोजी गोवा राज्यात सुट्टी

गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोंग पर्व, 18 डिसेंबर रोजी पुण्यतिथी यू सो सो थम आणि 19 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी असेल. यानंतर 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असेल.

ख्रिसमसची सुट्टी दोन दिवस असेल

ख्रिसमसदेखील डिसेंबर महिन्यात दोन दिवस सुट्टी असेल. 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबर रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने आठवड्याला सुट्टी असेल. दुसरीकडे 30 डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला थर्टी फर्स्टची काही राज्यात सुट्टी असेल.

Bank Holidays December 2020 Bank Will Be Closed For So Many Days In December This Day Will Work

संबंधित बातम्या :

बँक बुडाल्यानंतर तुमचे किती पैसे सुरक्षित असतील? जाणून घ्या…

SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी