नवी दिल्ली: येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारी महिना संपुष्टात येणार आहे. जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्च (march) साठी बँकेशी संबंधित कोणतीही कामं करण्याचा किंवा या महिन्यातील कामे पुढे ढकलण्याचा विचार करत असल्यास कॅलेंडर एकदा नक्कीच पाहा. कारण पुढच्या महिन्यात आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात, त्या दिवशी बँक बंद तर नाही ना, याची आताच खातरजमा करून घ्या. त्यामुळेच मार्चमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहतील (Bank Holidays in March 2021) ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. (Bank Holidays In March 2021 Banks To Remain Closed For 11 Days Check Complete List Here )
देशातील सर्व बँकांना ही 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. आपल्याकडेही मार्च महिन्यात बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच करून घ्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.
मार्च 2021 मध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या
5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
7 मार्च, रविवार
11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
13 मार्च, दुसरा शनिवार
14 मार्च, रविवार
21 मार्च, रविवार
22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
27 मार्च, चौथा शनिवार
28 मार्च, रविवार, होळी
29 मार्च, सोमवार, धूलिवंदन
30 मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस
देशभरात रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू झालेत. त्यानुसार आता ही सुविधा 24×7 उपलब्ध आहे. अशा प्रकारची सुविधा पुरवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून एनईएफटी (NEFT) सुविधा 24×7 सुरू करण्यात आली होती. त्यामुळेच देशात भारतात IMPS (Immediate Payment Service – IMPS), NEFT (National Electronic Fund Transfer- NEFT), RTGS (Real Time Gross Settlement – RTGS) 24 तासांमध्ये कधीही करणे शक्य आहे. RTGS मध्ये किमान 2 लाख रुपये ते कमाल कितीही पैसे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतरित करता येतात. आपण ऑनलाईन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून स्वतःच RTGS किंवा NEFT करू शकता. त्यामुळे बँका बंद असल्या तरी आपल्याला ऑनलाईन व्यवहार करणं सहजशक्य होणार आहे.
संबंधित बातम्या
SBI च्या 40 कोटी ग्राहकांनो लक्ष द्या, आता आधार देणे आवश्यक, अन्यथा मोठं नुकसान
SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे
Bank Holidays In March 2021 Banks To Remain Closed For 11 Days Check Complete List Here