बँकिंग क्षेत्रासाठी चांगली बातमी; इंडिया रेटिंग्सने आऊटलूकला केलं ‘Stable’

इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने वित्तीय वर्ष 2021-22 (India Ratings outlook on overall banking sector) मधील एकूण बँकिंग क्षेत्राबद्दलचे रेटिंग नकारात्मकवरून स्थिर ठेवलेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:17 PM, 22 Feb 2021
बँकिंग क्षेत्रासाठी चांगली बातमी; इंडिया रेटिंग्सने आऊटलूकला केलं ‘Stable’
Banking Sector

नवी दिल्लीः कोरोनामुळे बॅंकिंग क्षेत्रावर बॅड कर्जाचा बोजा लक्षणीय प्रमाणात वाढला आहे, परंतु बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेमार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचा परिणामही आता दिसून येतोय. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने वित्तीय वर्ष 2021-22 (India Ratings outlook on overall banking sector) मधील एकूण बँकिंग क्षेत्राबद्दलचे रेटिंग नकारात्मकवरून स्थिर ठेवलेत. रेटिंग एजन्सीला असा विश्वास आहे की, किरकोळ कर्ज देण्याच्या विभागात दबाव आणखी वाढू शकतो. (Banking Sector Ratings Upgraded To Stable For Financial Year
)

बँकांचा दृष्टिकोन नकारात्मक ते स्थिर असा बदलला

इंडिया रेटिंग्सने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा दृष्टिकोन नकारात्मक ते स्थिरपर्यंत (Negative outlook to stable) बदलला आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील बँकांचा दृष्टिकोन पूर्वीच्या स्थिर दृष्टिकोनातून (Stable outlook) कायम ठेवला गेलाय.

नऊ महिन्यांत बँकांना जुन्या मालमत्तेची तरतूद वाढविण्याची संधी

अहवालात म्हटले आहे की, बँकिंग प्रणालीतील एकूण दबाव म्हणजेच सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (जीएनपीए + पुनर्गठित कर्ज) 30 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. 2020-21 च्या उत्तरार्धात किरकोळ कर्ज विभागात ते 1.7 पट वाढू शकते. एजन्सीचे संचालक (वित्तीय संस्था) जिंदल हरिया म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यांत बँकांना जुन्या मालमत्तेची तरतूद वाढविण्याची संधी मिळालीय.

एनपीएवरील तरतूद 75 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढेल

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस या एनपीएवरील तरतूद 75 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा आमचा अंदाज आहे, असंही जिंदल हरियांनी सांगितले. यामुळे बँकांना कोविडचा दबाव सहन करण्यास वेळ मिळाला आहे. एजन्सीने चालू आर्थिक वर्षातील कर्जाच्या वाढीचा अंदाज 1.8 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये तो वाढवून 8.9 टक्के करण्यात आला आहे.

‘या’ बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार

खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने (IndusInd Bank) ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट’ (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांची कपात केलीय. ही कपात एमसीएलआरवर एका वर्षापासून केली जात आहे. आता इंडसइंड बँकेच्या एका वर्षाचा एमसीएलआरचा दर 8.65 टक्क्यांवरून 8.60 टक्के करण्यात आलाय. या कपातीमुळे इंडसइंड बँकेच्या EMI शी संबंधित गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज कमी होणार आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, नवीन दर 22 फेब्रुवारी 2021 पासून लागू आहेत.

संबंधित बातम्या

FD Rates In India: 2 कोटींपेक्षा कमी FD: SBI, PNB सह 5 मोठ्या बँकांमध्ये व्याजदर काय?

वर्षभरात फक्त 100 रुपये गुंतवून जीवनभराचं विमा सुरक्षा कवच, LIC ची जबरदस्त पॉलिसी

Banking Sector Ratings Upgraded To Stable For Financial Year