LPG अनुदान सोडल्यानंतर पुन्हा घ्यायचाय लाभ; ही पद्धत येणार कामी

जर आपण अनुदान सोडून पश्चाताप करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असा सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला पुन्हा सबसिडी मिळू शकेल. how to get lpg subsidy

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:03 PM, 19 Apr 2021
LPG अनुदान सोडल्यानंतर पुन्हा घ्यायचाय लाभ; ही पद्धत येणार कामी
how to get lpg subsidy

नवी दिल्लीः एलपीजी ग्राहकांच्या खिशावर पडणारे अतिरिक्त ओझे कमी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. परंतु अनेकांनी सरकारच्या आवाहनावर अनुदान सोडलेय, जेणेकरून गरजूंना त्याचा लाभ मिळावा. परंतु जर आपण अनुदान सोडून पश्चाताप करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असा सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला पुन्हा सबसिडी मिळू शकेल. (Benefits To Be Reclaimed After Release Of LPG Subsidy; This Method Will Work)

पुन्हा सबसिडी कशी घेऊ शकता?

जर तुम्ही एलपीजीवरील अनुदान एकदा सोडले असेल आणि आता तुम्हाला ते पुन्हा सुरू करावयाचे असेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज द्यावा लागेल. आपण आपल्या गॅस एजन्सीला भेट देऊन हा अर्ज द्यावा लागेल. या अर्जाद्वारे आपल्याला आयडी प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ, गॅस कनेक्शनची कागदपत्रे आणि उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक आहे. यावेळी गॅस एजन्सीद्वारे आपल्याला एक फॉर्म दिला जाईल, तोदेखील भरावा लागेल. यानंतर एजन्सीमार्फत चौकशी केली जाईल आणि सुमारे एक आठवड्यात पुन्हा अनुदान परत मिळू शकेल. याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या गॅस विक्रेता किंवा आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधू शकता. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे.

सरकारने चालवले गिव्ह इट अप अभियान

गरजू लोकांना गॅस अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने यापूर्वी ‘गिव्ह इट अप’ मोहीम सुरू केली होती. जे अनुदानाशिवाय एलपीजी खरेदी करू शकतात, ते स्वतःच्या इच्छेनुसार अनुदानाचा लाभ सोडावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. सरकारच्या या पुढाकारानंतर अनेकांनी त्याअंतर्गत एलपीजी अनुदान सोडले. पण कोरोना काळात अनेकांना पुन्हा अनुदानाची गरज भासू लागली. यामुळे त्यांना पुन्हा त्याचा फायदा घ्यायचा आहे.

अनुदान कसे मिळवायचे?

एलपीजी ग्राहकांना गॅस सबसिडीचा थेट लाभ देण्यासाठी सरकारने त्यांचे गॅस कनेक्शन बँक खाते आणि आधार कार्डशी जोडलेत. त्याअंतर्गत तेल कंपन्या प्रत्येक सिलिंडर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवते. यापेक्षा कमी किमतीत लोकांना सिलिंडर मिळतात. Benefits To Be Reclaimed After Release Of LPG Subsidy; This Method Will Work

संबंधित बातम्या

LPG गॅस सिलिंडरचा चेहरामोहरा बदलणार; असा दिसणार, पाहा फोटो

एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, केवळ 9 रुपयांत मिळवा सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग

how to get lpg subsidy again if you leave it once know process