गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स
नवीन गुंतवणूकदारांनी पाच बाबी लक्षात घेऊन गुंतवणुकीची पावलं उचलली पाहिजेत. (smart investor invest money)
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Published On -
15:32 PM, 23 Nov 2020

-
-
प्रत्येक जण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रगती करत असतो. पण ते ध्येय गाठणंसुद्धा तितकंच कठीण असतं. वैयक्तिक जीवन असो किंवा गुंतवणुकीचा मार्ग, ठरवलेलं लक्ष्य पूर्ण करणं फारच कष्टप्रद असते. आपण गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, याचा विचार करत असल्यास ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विशेषत: नवीन गुंतवणूकदारांनी पाच बाबी लक्षात घेऊन गुंतवणुकीची पावलं उचलली पाहिजेत, तरच त्यांना लाभ मिळू शकतो.
-
-
गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले पाहिजे- नवीन गुंतवणूकदारास प्रथम उत्पन्न आणि खर्चामधील ताळमेळ बसवणं आवश्यक आहे. घर खर्च किंवा इतर खर्च सोडून एका महिन्यात किती पैसे शिल्लक राहतात, याचं हिशेब ठेवावा लागेल. उत्पन्नातून खर्च बाजूला काढल्यानंतर उर्वरित रकमेचा भाग गुंतवता येऊ शकतो. आपण एका महिन्यात मोठी रक्कम गुंतवाल आणि पण नंतर दुसर्या महिन्यात गुंतवणुकीबद्दल विचार करत बसाल. म्हणूनच गुंतवणुकीचे लक्ष्य स्पष्ट असणे आवश्यक असते.
-
-
गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्टपणे समजून घ्या- असे म्हणतात की, एखाद्याने दुसर्याकडे पाहून पैशांची बचत करण्यास शिकले पाहिजे. पण गुंतवणूक नेहमीच तुमच्या बजेटनुसार करावी. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी, त्याच्याशी संबंधित सर्व बाबींबद्दल समजून घेणे आवश्यक असते. आपण उदाहरण म्हणून कुठे गुंतवणूक करत आहात?, आपले वय किती? आणि मिळणारा परतावा मोठा असेल की नाही?, वर्षानुवर्षे उत्पन्न वाढणार असेल तर मग ती रक्कम कुठे गुंतवायची.
-
-
गुंतवणुकीचे लक्ष्य ठरवलं पाहिजे- गुंतवणूकीपूर्वी त्याचा ‘रोडमॅप’ तयार करणं आवश्यक आहे, तेव्हाच लक्ष्य साध्य करता येईल. तुम्हाला वर्षाच्या अखेरीस 1 लाख रुपये हवे असतील, तर तुम्हाला त्या वर्षाचे आर्थिक गणित समजून घ्यावे लागेल. उदाहरणार्थ, एका वर्षासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे चांगली पद्धत नाही. अशा परिस्थितीत ध्येयाच्या जवळ नेतील, असे मार्ग अवलंबले जाणे आवश्यक आहे. जर दहा वर्षांनंतर एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट असेल, तर गुंतवणुकीसाठी योग्य निधी निवडण्याची आवश्यकता असते.
-
-
गुंतवणुकीच्या रकमेनुसार मिळेल परतावा- स्मार्ट गुंतवणूकदार हा असा आहे की, जो योग्य वेळी आपले लक्ष्य साध्य करतो. दोन वर्षांनंतर एखाद्याला लग्नासाठी 10 लाख रुपयांची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत हा काळ 2 वर्षांचा निश्चित आहे, जो पुढे वाढविला जाऊ शकत नाही. परंतु जर गुंतवणूकदारांकडून केवळ 10 हजार रुपये गुंतवणूक केली जात असेल तर हे लक्ष्य वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ध्येय आवश्यक आहे, परंतु वेळेसह ध्येय साध्य करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
-
-
सद्य आर्थिक परिस्थितीची काळजी घ्या- प्रत्येकाने गुंतवणुकीच्या वेळी सद्य आर्थिक परिस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. कारण जर आपण सर्व जमा केलेली रक्कम गुंतवणुकीत टाकली, तर सद्य आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूक मध्येच थांबवावी लागेल, ज्यामुळे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. म्हणून एखाद्याने पैसे खिशात न ठेवता त्याची गुंतवणूक करावी. आपण भविष्यासाठी दररोज गुंतवणूक केली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. पण वर्तमानाबरोबर तडजोड करून भविष्य सुखद करता येणार नाही.