आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI चा निर्णय, आता आपल्या पैशांचं काय?

आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ते 98 टक्के ठेवीदारांना पूर्णतः परतावा देण्यास सक्षम आहेत. परतावा डिपॉझिट इन्श्यॉरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) करेल. bhagyodaya Friends bank

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:12 PM, 22 Apr 2021
आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI चा निर्णय, आता आपल्या पैशांचं काय?
या बँकांना बसणार आरबीआयच्या नवीन नियमांचा फटका

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) भाग्योदल फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (अमरावती) चा परवाना रद्द केलाय. या बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही. तसेच सध्याच्या ठेवीदाराची परतफेड करण्यास ती बँक सक्षम नाही, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ते 98 टक्के ठेवीदारांना पूर्णतः परतावा देण्यास सक्षम आहेत. परतावा डिपॉझिट इन्श्यॉरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) करेल. (Bhagyodaya Friends Bank License Revoked, RBI’s Decision, Now What About Your Money?)

ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो

लिक्विडेशन झाल्यास प्रत्येक ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. हे DICGC कायदा 1961 च्या तरतुदीखाली आहे. भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बँकिंग व्यवसायावर 23 एप्रिलपासून बंदी घालण्यात आलीय. आम्ही परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, कारण बँकेकडे भांडवल नसल्याने आणि बँकिंग नियमन कायदा 1949 मधील अनेक तरतुदी पूर्ण करू शकत नाही, असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलेय.

म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली

परवाना रद्द करण्यापूर्वी आरबीआयने दुसर्‍या बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. फसवणुकीचा बळी ठरलेल्या या बँकेचे नाव आहे ‘Sambandh Finserve Pvt Ltd’. फसवणुकीनंतर या बँकेची निव्वळ मालमत्ता आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी होऊ लागली आणि अलिकडच्या काही महिन्यांत बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खराब होत गेली. मनी कंट्रोलने आपल्या एका अहवालात या प्रकरणाची माहिती देत दोन लोकांचा हवाला दिलाय.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा आरोप

वास्तविक Sambandh Finserve Pvt Ltdचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक किडो यांना या घोटाळ्याचा मुख्य आरोपी मानले जाते. दीपक किडो यांनाही चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. हे Sambandh Finserve Pvt Ltd यांनी एनबीएफसी-एमएफआय म्हणून नोंदवले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसार, बिगर-बँकिंग वित्तीय संस्थेला टीयर -1 आणि टीयर -2 च्या रूपात नेहमी भांडवल राखणे बंधनकारक आहे. ही जोखीम त्यांच्या धोक्याच्या 15 टक्के असावी.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘या’ बँकेचा कोरोना संकटात ग्राहकांना दिलासा; व्याजदर घटवले, आता EMI किती?

Bhagyodaya Friends Bank License Revoked, RBI’s Decision, Now What About Your Money?