Women’s Day 2021: सरकारची मोठी घोषणा! शगुन योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपये

ते म्हणाले, सरकारने शगुन योजनेंतर्गत दिलेली रक्कम 21,000 रुपयांवरून 51,000 रुपये करण्याचा प्रस्तावही ठेवला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:49 PM, 8 Mar 2021
Women’s Day 2021: सरकारची मोठी घोषणा! शगुन योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपये
एचडीएफसी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 33 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर 2 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक व्याजदर 6.20 टक्के असेल. त्याचबरोबर मुदत ठेवींवर 66 महिन्यांसाठी 6.60 टक्के व्याज दिले जाईल. एचडीएफसीच्या मते, 99 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर 6.65 टक्के ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रचलित दरावर 25 बीपीएस जादा व्याज मिळेल.

चंदीगड: आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021च्या निमित्ताने पंजाब सरकारने मुलींसाठी मोठी घोषणा केलीय. पंजाब सरकार मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये शगुन देणार आहे. पंजाब राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, सरकारने शगुन योजनेंतर्गत दिलेली रक्कम 21,000 रुपयांवरून 51,000 रुपये करण्याचा प्रस्तावही ठेवला. (Big announcement by the government! Under the Shagun scheme, a girl will get Rs 51,000 for marriage)

सोमवारी पंजाब राज्याचे 1,68,015 कोटी रुपयांचे बजेट सादर

2021-22 या आर्थिक वर्षासाठी पंजाबचे अर्थमंत्री बादल यांनी सोमवारी राज्याचे 1,68,015 कोटी रुपयांचे बजेट सादर केले. त्यांनी शेतकरी, महिला आणि वृद्धांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे बजेट आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात निवडणुका होणार आहेत.

ज्येष्ठांच्या पेन्शनमध्ये वाढ

अर्थमंत्री मनप्रीत सिंब बादल यांनी अर्थसंकल्पात वृद्ध पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला. वृद्धावस्था पेन्शन दरमहा 750 रुपयांवरून 1,500 रुपये करण्याची घोषणा केली. याशिवाय स्वातंत्र्यसैनिकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचीही सरकारने घोषणा केली. ते म्हणाले, 1 एप्रिलपासून राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची मासिक पेन्शन 7,500 रुपयांवरून दरमहा 9,400 रुपये केली जाईल.

शगुन योजनेंतर्गत 51 हजार रुपये मिळणार

पंजाब सरकारनेही शगुन योजनेंतर्गत दिलेली रक्कम 21,000 रुपयांवरून 51,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केलीय. या योजनेंतर्गत कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी शगुन दिले जाते. Big announcement by the government! Under the Shagun scheme, a girl will get Rs 51,000 for marriage

सरकार शेतकरी कर्ज माफ करेल

या व्यतिरिक्त पंजाब सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. अर्थमंत्री बादल यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे की, पंजाब सरकार 2021-2 मध्ये 1.1 लाख शेतकऱ्यांसाठी 1166 कोटी आणि भूमिहीन शेतकर्‍यांसाठी 626 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करेल.

संबंधित बातम्या

नोकरीच्या शोधात असाल तर महत्त्वाची बातमी, ‘या’ गोष्टी तुम्हाला करतील यशस्वी

‘या’ सरकारी कंपनीबरोबर करा फक्त 4 तास काम आणि कमवा 70 हजार; जाणून घ्या

Big announcement by the government! Under the Shagun scheme, a girl will get Rs 51,000 for marriage