केंद्र सरकारच्या ई-कॉमर्स धोरणाविरोधात देशातील बडे व्यापारी आक्रमक

सरकारी विभागांच्या हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे परकीय गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांना या क्षेत्रात पूर्ण मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे देशातील व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आजपर्यंत सरकारकडून कोणतेही अर्थपूर्ण पाऊल उचलले गेले नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या ई-कॉमर्स धोरणाविरोधात देशातील बडे व्यापारी आक्रमक
ई-कॉमर्स
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली: देशातील प्रमुख व्यावसायिक नेते भारत सरकारच्या ई-कॉमर्स धोरणाचा उघडपणे निषेध करत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAT) नेतृत्वाखाली आज देशातील सर्व राज्यांतील 33 प्रमुख व्यावसायिक नेत्यांनी एक संयुक्त निवेदन दिले. या संयुक्त निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोणतेही सरकारी धोरण नसल्यामुळे आणि एफडीआय नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे नियमांकडे अत्यंत उदासीनतेने दुर्लक्ष केले जात आहे.

सरकारी विभागांच्या हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे परकीय गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांना या क्षेत्रात पूर्ण मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे देशातील व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आजपर्यंत सरकारकडून कोणतेही अर्थपूर्ण पाऊल उचलले गेले नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?

केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांकडून ठोस कारवाईच्या अपेक्षेने जवळपास पाच वर्षे वाट पाहिल्यानंतर आम्हाला असे निवेदन जारी करावे लागले याचे आम्हाला मनापासून खेद आहे. सरकारसोबतच कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्राधान्यक्रमात व्यापारी नसल्याचे दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूक केलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांनी केलेल्या गैरप्रकारांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. हे सर्वात आश्चर्यकारक आहे की अमेरिकन सिनेटर्सनी भारतात अॅमेझॉनद्वारे होत असलेल्या गैरप्रकारांची दखल घेतली आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही सरकारी विभागाने किंवा मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले नाही.

पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा

व्यापाऱ्यांनी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आशा असल्याचे म्हटले आहे. ते लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्याविषयी सातत्याने बोलत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत गुजरातमधील व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. पण दुर्दैवाने नोकरशाही व्यवस्थेने त्यांची लघुउद्योगांबद्दलची दृष्टी खूप विकृत केली आहे.

व्यापाऱ्यांना पेन्शन, राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाची निर्मिती, व्यापाऱ्यांसाठी विमा, सरलीकृत जीएसटी, मुद्रा योजना आणि इतर अनेक पावले त्यांनी उचलली, पण हे अत्यंत खेदजनक आहे की सर्व योजना अतिशय विकृत झाल्या आहेत. जीएसटी हा सर्वात जटिल कर बनला. आम्ही पंतप्रधान मोदींकडे भेटीची मागणी केली आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते आवश्यक पावले उचलतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; Flash Sale होणार बंद

Explained: Online Shopping च्या नव्या कायद्यांचा कुणाल फायदा? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नेटवर्क मार्केटिंग संपणार? ई-कॉमर्स कंपन्यानंतर मोदी सरकारचा मोर्चा डायरेक्ट सेलिंग कंपन्यांकडे

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.