ICICI प्रुडेन्शियलच्या नव्या योजनेत मोठ्या कमाईची संधी; 1000 रुपयांपासून करा गुंतवणूक

निफ्टी हेल्थकेअर इंडेक्सवर लक्ष ठेवून सुरू केलेला हा ओपन-अँड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील बड्या कंपन्या यात गुंतवणूक करतात. icici prudential healthcare etf

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:16 PM, 4 May 2021
ICICI प्रुडेन्शियलच्या नव्या योजनेत मोठ्या कमाईची संधी; 1000 रुपयांपासून करा गुंतवणूक
icici prudential healthcare etf

नवी दिल्लीः ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने (ICICI Prudential Mutual Fund) हेल्थकेअर क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हेल्थकेअर ईटीएफ (Healthcare ETF) आणण्याची घोषणा केलीय. ICICI प्रुडेन्शियल हेल्थकेअर ईटीएफची नवीन फंड ऑफर (NFO) 6 मे 2021 रोजी उघडेल आणि 14 मे 2021 रोजी बंद होईल. निफ्टी हेल्थकेअर इंडेक्सवर लक्ष ठेवून सुरू केलेला हा ओपन-अँड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील बड्या कंपन्या यात गुंतवणूक करतात. (Big Earnings Opportunity in ICICI Prudential’s New Plan; Invest from Rs 1000)

कमीत कमी किती गुंतवणूक करू शकतो?

हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना हेल्थकेअर सेगमेंटमधून एक्सपोजर मिळवायचा आहे. एनएफओमध्ये किमान गुंतवणूक एक हजार रुपये असू शकते. या बेंचमार्क निफ्टी हेल्थकेअर टीआरआय इंडेक्सने दिलेल्या रिटर्न्सच्या समान प्रमाणात लाभ मिळवून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हा फंड एनएसई आणि बीएसईमध्ये सूचीबद्ध केला जाईल आणि त्याची युनिट्स व्यापारासाठी उपलब्ध असतील.

आरोग्य सेवा क्षेत्रातील 20 मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार

निफ्टी हेल्थकेअर इंडेक्सच्या 20 मोठ्या हेल्थकेअर कंपन्यांचा या निधीमध्ये समावेश करण्यात आलाय. यात सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज, डिव्हिस लॅब, सिप्ला आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ यांचा समावेश आहे. या निर्देशांकाने गेल्या 10 कॅलेंडर वर्षांतील 6 वर्षांत निफ्टी 50 निर्देशांकाला मागे टाकले आहे.

हेल्थकेअर क्षेत्रात येत्या दशकात निरंतर वाढ होण्याची अपेक्षा

ICICI प्रुडेन्शियल एमएमसीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा म्हणाले की, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल हेल्थकेअर ईटीएफ हेल्थकेअर क्षेत्रात सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. वाढत्या आरोग्याच्या समस्या, जीवनशैलीची निवड आणि साथीच्या आजारांचा विचार करता हेल्थकेअर क्षेत्रात येत्या दशकात निरंतर वाढ होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीने नेहमीच चांगल्या आरोग्य सुविधांची आवश्यकता असेल. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

गुंतवणूक कशी करावी?

ईटीएफ प्रथम एनएफओ म्हणून येतो. मग तो शेअर बाजारात सूचीबद्ध होतो. एनएफओ ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची नवीन योजना आहे. याद्वारे म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांकडून शेअर्स, सरकारी बाँड्ससारख्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे गोळा करते. ईटीएफची विक्री ट्रेडिंग पोर्टल किंवा स्टॉक ब्रोकरमार्फत स्टॉक मार्केटमध्ये केली जाते.

संबंधित बातम्या

तुम्ही सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करता, अकाऊंटमधून पैसे गायब होण्याचा धोका, BOI चा इशारा

दररोज 367 रुपये वाचवून 1 कोटींचा निधी जमवा, मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त फायदा

Big Earnings Opportunity in ICICI Prudential’s New Plan; Invest from Rs 1000