6 कोटी लोकांसाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदर कमी होणार; ‘या’ दिवशी घोषणा

कोरोनाच्या तुलनेत मागील वर्षी अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 2020-21 या आर्थिक वर्षासाठी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:37 PM, 2 Mar 2021
6 कोटी लोकांसाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदर कमी होणार; 'या' दिवशी घोषणा
Public Provident Fund

नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ) च्या 6 कोटी ग्राहकांकरिता महत्त्वपूर्ण बातमी आहे. ईपीएफओचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (सीबीटी) आर्थिक वर्ष 2020-21 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर जाहीर करणार आहेत. सीबीटीची बैठक 4 मार्चला श्रीनगर येथे होणार आहे. या बैठकीत पीएफ व्याजदर जाहीर केला जाणार आहे. कोरोनाच्या तुलनेत मागील वर्षी अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 2020-21 या आर्थिक वर्षासाठी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Big News For 60 Crore People! PF Interest Rates Will Be Lower; Announcement On 4 March 2021)

आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये 8.5 टक्के व्याज देण्याचे निश्चित

सरकारने वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज देण्याचे ठरविले होते, जे सात वर्षातील सर्वात कमी होते. त्याचबरोबर 2018-19 या आर्थिक वर्षात हा दर 8.65 टक्के होता. यापूर्वी 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये 8.5 टक्के व्याज देण्याचे मंडळाने म्हटले होते. 8.15 टक्के कर्ज गुंतवणुकीद्वारे दिले जाईल आणि 0.35 टक्के व्याज इक्विटीमधून दिले जाईल. यापूर्वी 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये 8.5 टक्के व्याज देण्याचे मंडळाने ठरवले होते. 8.15 टक्के कर्ज गुंतवणुकीद्वारे दिले जाईल आणि 0.35 टक्के व्याज इक्विटीमधून दिले जाणार आहे. यापूर्वी सेवानिवृत्ती समितीने 31 डिसेंबर 2020 पर्यंत कर्ज उत्पन्नातून 8.15 टक्के आणि उर्वरित 0.35 टक्के ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) विक्रीतून देण्यात येतील, असे म्हटले होते.

व्याज दर किती होता?

मार्च 2020 मध्ये ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर आर्थिक वर्ष 2019-20 साठी 8.5 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. गेल्या 7 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. ईपीएफओने आपल्या ग्राहकांना 2017-18 साठी 8.55 टक्के व्याजदर प्रदान केले होते. 2016-17 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्के होता. 2013-14 मध्ये पीएफ ठेवींवर 8.75 टक्के व्याज उपलब्ध होते. 5 फेब्रुवारी 1953 रोजी सीबीटीची पहिली बैठक झाली. सीबीटीच्या बैठका बहुधा दिल्ली, शिमला, पाटणा, चेन्नई आणि मुंबई येथे घेण्यात आल्यात. कामगार मंत्री यांच्या नेतृत्वात सीबीटीचे सुमारे 40 सदस्य आहेत.

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, चांदीही स्वस्त; पटापट जाणून घ्या तोळ्याचा भाव

Paytm चा लाखो ग्राहकांना इशारा! नवे डेबिट कार्ड मिळाल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

Big News For 60 Crore People! PF Interest Rates Will Be Lower; Announcement On 4 March 2021