रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! आता घर बसल्या मिळणार धान्य, हे सरकारी अ‍ॅप येणार कामी

या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सुरू केलंय. याद्वारे आता आपण घरी बसून धान्य मिळवू शकता. ration card holders Mera Ration App

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:35 PM, 16 Apr 2021
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! आता घर बसल्या मिळणार धान्य, हे सरकारी अ‍ॅप येणार कामी
ration card holders Mera Ration App

नवी दिल्लीः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme) चालविली जाते. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते. परंतु तेथे गर्दी आणि लांब रांगा असल्याने अनेकदा रेशन मिळण्यास अडचण येते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सुरू केलंय. याद्वारे आता आपण घरी बसून धान्य मिळवू शकता. (Big news for ration card holders! Now you will get grain at home by Mera Ration App, this government app will come in handy)

मेरा रेशन अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग

हे अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहे. याद्वारे आपण घरी बसून रेशन बुक करू शकता. यासंदर्भात अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले की, एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान (Fair Price Shop) किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे.

नोंदणीनंतर आपण घेऊ शकता लाभ

माय रेशन अॅपचा लाभ घेण्यासाठी प्रथम ते Google Play Store वरून ते डाऊनलोड करा. इंस्टालेशननंतर अ‍ॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून रेशन मागवू शकता.

अ‍ॅपचे फायदे

>> या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, कारण एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना त्यांना अनेकदा रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. परंतु या अॅपद्वारे या समस्येवर मात करता येईल.
>> या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.
>> रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.
>> रेशन कार्डधारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

14 भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध होईल

मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण बहुतेक स्थलांतरित इतर राज्यांमधून आलेत, त्यामुळे त्यांना भाषेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच त्यांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जातील. जेणेकरून अ‍ॅप वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

संबंधित बातम्या

SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! चुकून इंटरनेटवर शोधू नका ‘हा’ नंबर अन्यथा खात्यातून पैसे गायब

PPF गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; व्याजदर वाढवणे आणि मॅच्युरिटी कालावधी घटवण्याच्या सूचना

Big news for ration card holders! Now you will get grain at home by Mera Ration App, this government app will come in handy