गृहकर्जदारांसाठी दिलासादायक बातमी; आणखी एका बँकेनं घटवले व्याजदर

अनेक बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर सतत कमी केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:06 AM, 2 Nov 2020

नवी दिल्लीः बँक ऑफ बडोदानंतर आता युनियन बँकेनेही गृहकर्ज स्वस्त केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या विविध प्रकारांचे व्याजदर कमी केले आहेत. अनेक बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर सतत कमी केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bob, Union Bank Reduced Interest Rate Of Home)

यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनीही गृह कर्जाचे दर कमी केले होते. युनियन बँकेने म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जाची प्रक्रिया शुल्कही कमी केले आहे. गृहकर्ज घेतल्यास 10 हजार रुपयांपर्यंत सवलतही बँकेने देऊ केली आहे.

महिला अर्जदारांना अतिरिक्त सूट

30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्ज घेतलेल्यांच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचे बँकेने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महिला अर्जदारांना अशा कर्जावरील व्याजदरामध्ये 0.05 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. अशा प्रकारे महिला अर्जदारांचे व्याज 0.15 टक्क्यांनी स्वस्त असेल.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेने 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जाची प्रक्रिया शुल्कही कमी केल्याचे म्हटले आहे. याशिवाय वाहन आणि शैक्षणिक कर्जावरील प्रक्रिया शुल्कही काढले आहे.

ग्राहकांना मिळेल व्याजदराचा लाभ

युनियन बँक म्हणाली, “सणासुदीचा हंगाम पाहता, किरकोळ आणि एमएसएमई सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून अनेक वित्त पुरवठा मोहिमा सुरू केल्या आहेत.” बँकेने अशी आशा व्यक्त केली आहे की, कर्जदार बँकेने दिलेल्या कमी व्याजदराचा फायदा घेतील आणि कर्ज घेतील.

बँक ऑफ बडोदाने दर कमी केले

विशेष म्हणजे आपल्या पुढाकाराने शनिवारी बँक ऑफ बडोदाने (बीओबी) रेपो दराशी संबंधित कर्जाचे व्याजदर सात टक्क्यांवरून 6.85 टक्क्यांवर आणले. बँकेचा हा नवीन दर 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू झाला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, ‘हे’ दहा बदल

देशातील 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण, सरकारचा मोठा निर्णय