कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ब्रिटनने भारताला प्रवासाच्या ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) म्हणाले की, केवळ ब्रिटिश आणि आयरिश नागरिक भारतातून ब्रिटनमध्ये येऊ शकतील. britain india red list travel

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:15 AM, 20 Apr 2021
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ब्रिटनने भारताला प्रवासाच्या 'रेड लिस्ट'मध्ये टाकले
britain india red list travel

लंडनः देशात कोरोना विषाणूनं (Coronavirus) हाहाकार माजवला असून, दिवसागणिक मृत्यूची आकडेवारीही वाढत आहे. दररोज नवनवी प्रकरणे नोंद होत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांची भारत भेट रद्द झाल्यानंतर ब्रिटनने आता भारताला प्रवासाच्या लाल यादीमध्ये टाकलेय. ब्रिटनने भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट’ प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केलीय आणि आता लोकांना भारतातून ब्रिटनला जाता येणार नाही. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) म्हणाले की, केवळ ब्रिटिश आणि आयरिश नागरिक भारतातून ब्रिटनमध्ये येऊ शकतील. (Britain has put India on a travel red list due to the growing number of cases of corona)

आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक (Matt Hancock) म्हणाले की, रेड लिस्टेड देशाचे नागरिक ब्रिटनमध्ये आल्यास त्यांना सरकारने मंजूर केलेल्या क्वारंटाईन हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या देशांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशची नावेही समाविष्ट आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौर्‍यावरून गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन सरकारवर टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर हॅनकॉकने भारताला रेड लिस्टमध्ये टाकत असल्याची माहिती तिकडच्या संसदेत दिली.

सरकारांचे संयुक्त निवेदन जारी

भारतात कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि तेथे सापडलेल्या नवीन कोविड अवतारामुळे (India on Boris Johnson Visit) बोरिस जॉन्सन यांनी दौरा रद्द करत असल्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जानेवारी महिन्यात बोरिस जॉन्सनचा भारत दौरा रद्द करण्यात आला होता. वर्ष 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर जॉन्सनचा यांचा भारताचा पहिला दौरा होता. भारत आणि ब्रिटन सरकारने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना विषाणूची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील आठवड्यात भारतात येऊ शकणार नाहीत.”

आता दोन्ही नेते चर्चा करतील

निवेदनात म्हटले आहे की, जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस ब्रिटन आणि भारत यांच्यातील भावी भागीदारीसाठी महत्त्वाकांक्षी योजनांशी सहमत होण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचे संकट भारताची राजधानी दिल्ली कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे सात दिवसांचे लॉकडाऊन लावण्यात आलेय. जॉन्सन जर भारतात आले असते तर ते राजधानी दिल्लीतच राहिले असते, परंतु इथे सध्या संसर्गामुळे परिस्थिती खूपच वाईट आहे. Britain has put India on a travel red list due to the growing number of cases of corona

संबंधित बातम्या

1 मेपासून तरुणांनाही लस; नोंदणी कशी कराल, खर्च किती?, एका क्लिकवर सर्व माहिती

India Corona Update : सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय, वाचा सविस्तर

britain adds india in red list of travel due to coronavirus surge