भारतात केटीएमची स्वस्त बाईक लाँच, किंमत आणि फीचर्स

मुंबई : केटीएमने (KTM) नवीन अवेटेड बाईक 125DUKE चे भारतात लाँच केली आहे. कंपनीने बाईकच्या एक्स शोरुमची किंमत 1.18 लाख रुपये ठेवली आहे. 125DUKE बाईक केटीएमच्या सर्व बाईकमध्ये स्वस्त बाईक बनली आहे. या बाईकची स्टाईल KTM 200 DUKE सारखी आहे. केटीएम 125 ड्यूकमध्ये 124.7 cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिंलिंडर इंजिन दिले आहे.  हे इंजिन 9,250 rpm …

भारतात केटीएमची स्वस्त बाईक लाँच, किंमत आणि फीचर्स

मुंबई : केटीएमने (KTM) नवीन अवेटेड बाईक 125DUKE चे भारतात लाँच केली आहे. कंपनीने बाईकच्या एक्स शोरुमची किंमत 1.18 लाख रुपये ठेवली आहे. 125DUKE बाईक केटीएमच्या सर्व बाईकमध्ये स्वस्त बाईक बनली आहे. या बाईकची स्टाईल KTM 200 DUKE सारखी आहे.

केटीएम 125 ड्यूकमध्ये 124.7 cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिंलिंडर इंजिन दिले आहे.  हे इंजिन 9,250 rpm वर 14.5 hp ची पॉवर आणि 8,000rpm वर 12Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड ट्रांसमिशनने लेस केले आहे. बाईकमध्ये सिंगल चैन एबीएस दिले आहे. ब्रेकिंगमध्ये पाहिले तर फ्रंटला 300 mm डिस्क आणि रिअरला 230 mm डिस्क दिला आहे.

200 ड्यूक सारख्या दिसणाऱ्या बाईकचा लूक बदलण्यासाठी थोडा बदल 125 ड्यूकमध्ये करण्यात आला आहे. बाईकमध्ये ट्रेली फ्रेम, ऐल्युमिनियम स्विंगआर्म, फ्रंटला 43 mm अपसाइड डाउन फोकस आणि रिअरला 10-स्टेप अॅजस्टेबल मोनोशॉक आहे. 125 ड्यूकची उंची 818 mm आणि वजन 148 किलोग्राम आहे. नवीन बाईकच्या मायलेजची माहिती अजून समोर आली नाही. पण 124.7cc इंजिन असल्यामुळे मायलेज मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

125 ड्यूकच्या लॉचिंग दरम्यान कंपनीने सांगितले की, देशातील 450 शोरुममध्ये ही बाईक उपलब्ध असेल. भारतातील केटीएमच्या सर्वात स्वस्त बाईकच्या बुकिंगची सुरुवात एक महिन्या पासून सुरु झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *