मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या ‘कारण’

2019-20 या आर्थिक वर्षात सिटी बँकेला निव्वळ 4,912 कोटी रुपयांचा नफा झाला होता, मागील आर्थिक वर्षात व्यवसाय 4,185 कोटी रुपये होता. Citi Bank Roll Out Business India

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:45 PM, 15 Apr 2021
मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या 'कारण'
Citi Bank Roll Out Business India

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत रिटेल बँकिंग कंपनी सिटी बँक (Citi Bank) भारतातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. भारतात ग्राहक बँकिंग व्यवसाय बंद करणार असल्याची माहिती गुरुवारी बँकेनं दिलीय. आता हा गट 13 आंतरराष्ट्रीय ग्राहक बँकिंग मार्केटमधून बाहेर पडेल. बँकेच्या जागतिक रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. आता ही बँक संपत्ती व्यवस्थापन व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात सिटी बँकेला निव्वळ 4,912 कोटी रुपयांचा नफा झाला होता, मागील आर्थिक वर्षात व्यवसाय 4,185 कोटी रुपये होता. (Citi Bank To Roll Out Its Business From India And 11 Other Retail Markets)

‘या’ देशातील बँकिंग व्यवसाय सिटी ग्रुप सुरूच ठेवणार

परंतु सिंगापूर, हाँगकाँग, लंडन आणि यूएई या देशातील मार्केटमधील जागतिक ग्राहक बँकिंग व्यवसाय सिटी ग्रुप सुरूच ठेवणार आहे. तर चीन, भारत आणि अन्य 11 किरकोळ बाजारपेठांमधून हा व्यवसाय गुंडाळण्यात येणार आहे. सिटी बँकेच्या बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटीबँकच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी बँक मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे.

हा कंपनीच्या धोरणात्मक रणनीतीचा एक भाग

सिटी बँकेचे मुख्य अधिकारी जेन फ्रेझर म्हणाले की, हा कंपनीच्या धोरणात्मक रणनीतीचा एक भाग आहे. या निर्णयामागील कारण म्हणजे या भागातल्या व्यावसायिक स्पर्धेत बँक कमी पडणे. यातून बाहेर पडण्याबाबत बँकेकडून अद्यापही रुपरेषा ठरवण्यात आलेली नाही. तसेच ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याच्या प्रस्तावाला नियामक मान्यता आवश्यक असते. सिटी बँकेने 1902 मध्ये भारतात प्रवेश केला आणि 1985 मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसायात उतरली.

संपत्ती व्यवस्थापनात अधिक संधी मिळेल, अशी अपेक्षा

फ्रेझर यांनी यंदा मार्चमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते म्हणाले की, आम्हाला मजबूत वाढीची शक्यता आहे आणि संपत्ती व्यवस्थापनात अधिक संधी मिळेल, अशी आशा आहे. पहिल्या तिमाहीत सिटी ग्रुपने 7.9 बिलियन डॉलर नफा कमाविला होता, जो बँकेच्या एका वर्षापूर्वीच्या नफ्यापेक्षा अधिक आहे. महसूल सात टक्क्यांनी घसरून 19.3 अब्ज डॉलर्सवर आला. ज्या इतर देशांमध्ये सिटी बँक आपला व्यवसाय बंद करीत आहे, त्यात ऑस्ट्रेलिया, बहरिन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

कोरोनातही सरकारच्या ‘या’ योजनेनं जनता खूश; 291 रुपये जमा कर अन् मिळवा 12 हजार

Post Office मध्ये मिळतो विमा, दररोज 95 रुपये वाचवून मिळणार 14 लाख रुपये

Citi Bank To Roll Out Its Business From India And 11 Other Retail Markets