कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

NEET-PG परीक्षा कमीत कमी 4 महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. Prime Minister Narendra Modi

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:49 PM, 3 May 2021
कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
Prime Minister Narendra Modi

नवी दिल्लीः देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) हाहाकार माजवलेला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटानंतरही देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वैद्यकीय वैकर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय. NEET-PG परीक्षा कमीत कमी 4 महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. (Covid warriors now preferred in government jobs, Prime Minister Narendra Modi big announcement)

रोना संकटाला तोंड देण्यासाठी कठोर निर्णयांची अंमलबजावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सतत बैठक घेतायत आणि कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी कठोर निर्णयांची अंमलबजावणीही करतायत. सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे.

सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार

कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. नुकतेच हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार असून, त्यांची कमतरता भासू शकते. महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.

पंतप्रधान मोदींचे महत्त्वपूर्ण निर्णय

>>वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
>>ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.
>>सर्व कोविड योद्धे जे कोरोनाविरुद्ध 100 दिवसांच्या कर्तव्यासाठी तयार असतील आणि ते पूर्ण करतील त्यांना भारत सरकारच्या वतीने पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील देण्यात येईल.
>>पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Mamata Banerjee on Journalist : ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Covid warriors now preferred in government jobs, Prime Minister Narendra Modi big announcement