स्मार्ट खेळी अंगलट! धोनी ते दिपिकापर्यंत….BluSmart कंपनीत दिग्गजांचा पैसा, आता कंपनीच गोत्यात, अनेकांना गंडा
BluSmart Crisis : या कंपनीने इलेक्ट्रिक आणि अक्षय ऊर्जेवर आधारीत बिझनेस मॉडल उभे केले होते. भविष्यात मोठा परतावा मिळेल या अपेक्षेने कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीसह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि इतर दिग्गजांनी कंपनीत गुंतवणूक केली होती.

इलेक्ट्रिक उत्पादन स्टार्टअप BluSmart च्या सह संस्थापकावर पैशांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर आता ही कंपनी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. आता हे सर्व प्रकरण SEBI च्या चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. कंपनीने दिल्ली-NCR, मुंबई आणि इतर ठिकाणी सुरू असलेली कॅब सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंदी केली आहे. कंपनी सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक आणि अक्षय ऊर्जेवर आधारीत बिझनेस मॉडल उभे केले होते. भविष्यात मोठा परतावा मिळेल या अपेक्षेने कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीसह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि इतर दिग्गजांनी कंपनीत गुंतवणूक केली होती. पण सर्वांचीच गुंतवणूक धोक्यात आली आहे. कंपनीने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.
कंपनी खरंच बुडणार?
या कंपनीचे सहसंस्थापक अनमोल सिंह जग्गी आणि त्यांचे भाव पुनित सिंह जग्गी हे Gensol Engineering चे प्रमोटर्स आहेत. त्यांनी जेनसोल या कंपनीच्या नावावर कर्ज काढले आणि त्याचा चुकीचा वापर केल्याचे समोर आले आहे. या पैशातून या दोघांनी फ्लॅट, ग्लोल्फ किट इतर आलिशान वस्तूंची खरेदी केल्याचे समोर आले. या सर्व वस्तूंवर या दोघांनी 262 कोटी रुपये खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सेबीने या कंपनीचे प्रमोटर्सला इतर कोणत्याही कंपनीच्या व्यवस्थापनात जाण्यास विरोध केला. तसेच बाजारात व्यवहारास प्रतिबंध घातला.




या दिग्गजांची मोठी गुंतवणूक
ब्लूस्मार्टमधील या घोटाळ्यांच्या मालिकेने गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. BluSmart ने सुरुवातीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. 2019 मध्ये दीपिका पदुकोण हिच्या कुटुंबियांनी बजाज, JITO एंजल नेटवर्क आणि रजत गुप्ता यांच्यासोबत 3 दशलक्ष डॉलरच्या एंजल फंडिंग राऊंडमध्ये सहभाग घेतला होता. NDTV प्रॉफिटच्या एका अहवालानुसार, धोनी आणि दीपिका यांनी या कंपनीची वाढ जोमात व्हावी यासाठी प्रयत्न केले.
खासगी आकडेवारीनुसार, जग्गी ब्रदर्सकडे ब्लूस्मार्टमध्ये जवळपास 33 टक्के वाटा आहे. तर बीपी वेंचर्सकडे 14.3 टक्के वाटा आणि नंतर इतर गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम गुंतवली आहे. अनेक दिग्गजांनी सहकार्यांसोबत मिळून मोठा निधी या कंपनीत गुंतवला आहे.