‘या’ अ‍ॅपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस RD अकाऊंटमध्ये जमा करा ऑनलाईन पैसे; घरबसल्या होणार काम

या अॅपच्या माध्यमातून आरडी अकाऊंटमध्ये मंथली हप्त्याला ऑनलाइन ट्रान्सफर केलं जाऊ शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:06 PM, 12 Jan 2021
Deposit Money Online

नवी दिल्लीः पोस्टात गुंतवणूक करणं नेहमीच चांगला पर्याय समजला गेलाय. पोस्टातील गर्दीचा विचार केल्यास बरेचशे लोक पोस्ट ऑफिस जाणं टाळतात. आता या संकटातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. जर आपण पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट (RD) उघडलं असल्यास आपण घरबसल्या पैसे जमा करू शकता. IPPB (India Post Payments Bank) ऍपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा केले जाऊ शकतात. या अॅपच्या माध्यमातून आरडी अकाऊंटमध्ये मंथली हप्त्याला ऑनलाइन ट्रान्सफर केलं जाऊ शकते. (Deposit Money Online In The Post Office RD Account Ippb App)

आरडीमध्ये ऑनलाईन डिपॉझिट कसे कराल?
=>> सर्वात आधी IPPB अकाऊंटमध्ये आपल्या बँक खात्याला ट्रान्सफर करा
=>> आता DOP प्रोडक्ट्सवर जाऊन रेकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडा
=>> इथे आरडी अकाऊंट नंबर आणि DOP कस्टमर आयडी भरा
=>> त्यानंतर आरडीमध्ये इन्स्टालमेंट पीरियड आणि अमाऊंट टाका.
विशेष म्हणजे इथे आपल्याला ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफरचं नोटिफिकेशन मिळणार आहे. त्याशिवाय आयपीपीबी सेव्हिंग्ज अकाऊंटवर इंडिया पोस्टाच्या दुसऱ्या योजनेसाठी पेमेंट केलं जाऊ शकतं.

रेकरिंग डिपॉझिटचे काय आहेत फायदे?

रेकरिंग डिपॉझिट किंवा RD च्या माध्यमातून आपण पैसे वाचवू शकता. जर आपण पगारदार असल्यास प्रत्येक महिन्याला पगाराचा काही भाग रेकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवू शकता. त्यासाठी आपण वेळही ठरवू शकता. कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्यालाल एक चांगली रक्कम परत मिळू शकते.
इंडिया पोस्टात आरडीमध्ये 5.8% इंटरेस्ट रेट दिला जातोय. विशेष म्हणजे आरडी योजनेत मिनिमम इन्वेस्टमेंट अमाऊंट फक्त 100 रुपये असावी. म्हणजे आपण दर महिन्याला 100 रुपये जमा करू शकता.

संबंधित बातम्या

पोस्टात फक्त 500 रुपयांत खातं उघडा; ‘या’ तीन योजनांमध्ये बँकेपेक्षा जबरदस्त फायदा

PPF, सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिस योजनेतील नियमात मोठे बदल, जबरदस्त सवलती

Deposit Money Online In The Post Office RD Account Ippb App