पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख, नेमकी योजना काय?

RPLI लोकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन 6 प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करते. यात आपण ग्राम सुमंगल (Gram Sumangal) योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:51 PM, 7 Apr 2021
1/6
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मार्चमध्ये संसदेत सांगितले होते की, सरकार 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता पूर्ववत होईल. सध्या महागाई भत्ता 17 टक्के आहे. 1 जुलैला तो वाढून 28 टक्क्यांपर्यंत जाईल. महागाई भत्ता वाढल्यामुळे नाईट अलाऊन्स वाढेल. कोरोनामुळे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी महागाई भत्ता गोठवण्यात आला होता.
2/6
ग्राम सुमंगल ही मनी बॅक विमा पॉलिसी आहे. याची जास्तीत जास्त रक्कम 10 लाख रुपये आहे. जर आपल्याला वेळोवेळी परतावा हवा असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत विमाधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला वेळोवेळी मनीबॅकचा लाभ मिळतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीस एकूण विम्याची रक्कम आणि बोनस मिळेल. या पॉलिसीअंतर्गत 20 वर्षांपर्यंत 2850 रुपये प्रीमियम जमा केल्यास सुमारे 14 लाख रुपये मिळतील
3/6
ग्राम सुमंगलसाठी पॉलिसीची मुदत 15 वर्षे आणि 20 वर्षे आहे. ही पॉलिसी किमान 19 व्या वर्षात खरेदी केली जाऊ शकते. वयाच्या 40 व्या वर्षांपर्यंत गुंतवणुकीद्वारे पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. आपण वयाच्या 40 व्या वर्षात प्रवेश घेत असल्यास पॉलिसीची मुदत 20 वर्षे असू शकते. आपण वयाच्या 45 व्या वर्षी प्रवेश घेतल्यास पॉलिसीची कमाल मुदत 15 वर्षे असेल.
4/6
जर तुम्ही 15 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर सम अॅश्युअर्डच्या 20-20 % रक्कम मिळेल. परिपक्वतेवर 40 % पैसे परत आणि बोनस उपलब्ध आहे. पॉलिसीची मुदत 20 वर्षे असेल, तर 8, 12, 16 वर्षे 20-20 टक्के पैसे परत मिळतील. मॅच्युरिटीवर 40% मनीबॅकसह बोनसची रक्कम उपलब्ध आहे.
5/6
आपत्कालीन परिस्थितीत पैशांची व्यवस्था कशी करावी?
6/6
फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला 8, 12, 16 व्या वर्षी 1.4-1.4 लाख रुपये मिळतील. 20 व्या वर्षी विम्यासाठी 2.8 लाख रुपये प्राप्त होतील. बोनस प्रति हजार सम अश्योर्डवर एका वर्षासाठी 48 रुपये आहे. अशा प्रकारे 7 लाख सम अ‍ॅश्युअर्डसाठी वार्षिक बोनस 33600 रुपये आहे. 20 वर्षांत ते 6.72 लाख रुपये होते. अशा प्रकारे 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला एकूण 13.72 लाख रुपये मिळतील. मात्र, यातून त्याला मनीबॅकच्या स्वरूपात एकूण 4.2 लाख रुपये मिळाले असते. पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर A ला एकाच वेळी 9 लाख 52 हजार रुपये मिळतील.