LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार

ज्येष्ठांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री व्यय वंदना योजना (Pradhan Mantri vaya vandana yojana) सुरू केली असून, याचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंत मिळू शकेल. get 23000 pension in LIC's PMVVY scheme

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:24 PM, 7 Apr 2021
1/6
जर आपल्याला आपले आयुष्य आनंदाने घालवायचे असेल तर तारुण्याबरोबरच वृद्धावस्थेची सोय आता करून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. जर वृद्धापकाळात तुम्हाला नियमित अंतराने पेन्शन म्हणून पैसे मिळत राहिल्यास, तुमचं आयुष्य खूपच सुखकारक होईल. म्हणूनच भविष्य सुरक्षित करण्याचे काम तरुणातच सुरू झाले पाहिजे. ज्येष्ठांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री व्यय वंदना योजना (Pradhan Mantri vaya vandana yojana) सुरू केली असून, याचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंत मिळू शकेल.
2/6
LIC
एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती
3/6
या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन 100 रुपये आणि वर्षाकाठी 12000 रुपये असेल. जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9250 रुपये आणि वार्षिक 1 लाख 11 हजार रुपये असेल. तुम्हाला 1000 ची मासिक पेन्शन हवे असल्यास तुम्हाला किमान 1.62 लाख रुपये जमा करावे लागतील. वर्षाकाठी 12 हजार पेन्शन घेतल्यावर तुम्हाला 1.56 लाख रुपये जमा करावे लागतील. जर मासिक 9250 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर त्यांना 15 लाख रुपये जमा करावे लागतील आणि जर त्यांना वार्षिक 1.11 लाख रुपये पेन्शन पाहिजे असेल, तर त्यांना 14.50 रुपये जमा करावे लागतील.
4/6
या पेन्शन योजनेचे तीन मुख्य फायदे आहेत. जर पेन्शनधारक 10 वर्षे जिवंत राहिला तर त्याला पेन्शन मिळत राहील. पेन्शन मोड मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक असू शकते. जर 10 वर्षांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर खरेदी किंमत नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल. जर पेन्शनधारक 10 वर्षे जिवंत राहिला, म्हणजे पॉलिसी परिपक्व असेल तर निवृत्तीवेतनधारकाला पेन्शनची रक्कम परत मिळते.
5/6
Special offers to senior citizens from several banks
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये कर्जदेखील उपलब्ध आहे. पॉलिसीची 3 वर्षे पूर्ण झाल्यावर कर्जाची योजना उपलब्ध आहे. कमाल कर्जाची रक्कम खरेदी किमतीच्या 75% असू शकते. 30 एप्रिल 2021 पर्यंत कर्ज दिले जाते, तेव्हापर्यंत व्याजदर वार्षिक 9.5% आहे. जर पॉलिसीधारकांना ही योजना आवडत नसेल तर तो पालिकेच्या 15 दिवसांत ही पॉलिसी परत करू शकतो. आपण पॉलिसी ऑनलाईन विकत घेतल्यास आपल्याला 30 दिवस मिळतील.
6/6
jeevan shanti scheme
jeevan shanti scheme