नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय. सध्या हिवाळा असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात असे होतच असते. हिवाळा संपल्यानंतर किमती पुन्हा खाली उतरतील, असंही पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणालेत. (Dharmendra Pradhan Says Petrol Diesel Price Become Costly In Winters)
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्था एएनआयला ही माहिती दिलीय. प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर परिणाम झालाय. जेव्हा हिवाळा संपेल तेव्हा किमती देखील खाली येतील. वाढत्या मागणीमुळे हिवाळ्यात किमती गगनाला भिडल्या आहेत. येत्या काही दिवसांत किमती कमी होतील.
तेल उत्पादक देशांच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आपण किमती वाढवू शकत नाही, कारण त्याचा परिणाम आयात देशांवर होतो. खराब हवामानामुळे अमेरिकेतील उत्पादन गेल्या दोन-तीन आठवड्यांत मंदावले आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. तत्पूर्वी, धर्मेंद्र प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, त्यांचे मंत्रालय जीएसटी कौन्सिलला पेट्रोलियम पदार्थांना त्याच्या कक्षेत समाविष्ट करण्याची विनंती करत आहे, कारण त्याचा फायदा लोकांच्या हितासाठी होणार आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही असे संकेत दिले होते. जीएसटी कौन्सिलने पेट्रोलियम मंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी केल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निम्म्यावर आणल्या जातील. त्यांनी सांगितले की, राजस्थान आणि महाराष्ट्रात कराचा मोठा वाटा राज्य सरकारचा आहे. राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे आणि महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे. म्हणजेच सोनिया गांधींनी आधी महाराष्ट्र सरकारांशी बोलले पाहिजे, असंही त्यांनी सुचवलंय.
संबंधित बातम्या:
Special Report | पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी वर! ठाकरे सरकार सर्वसामन्यांना दिलासा देणार?
SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!
Dharmendra Pradhan Says Petrol Diesel Price Become Costly In Winters