SBI मध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला गॅरेंटर हवा की फक्त आधार लागणार? बँकेने दिले हे उत्तर

काही काळापूर्वी ई-केवायसी बाबतचे मुख्य परिपत्रक आरबीआयने अपडेट केले होते. या नवीन परिपत्रकानुसार नवीन बँक खात्यासाठी आधार आणि पॅन क्रमांक देणे बंधनकारक असेल.

SBI मध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला गॅरेंटर हवा की फक्त आधार लागणार? बँकेने दिले हे उत्तर
state bank of india
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 6:24 AM

नवी दिल्लीः जर कोणत्याही बँकेत बचत बँक खाते उघडायचे असेल तर त्यासाठी गॅरेंटर लागतो, आजही बऱ्याच लोकांचा असा समज आहे. पण तसे काहीही नसून आज बँकिंग नियम पूर्णपणे बदललेय. आता जर तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार बँकेत खाते उघडण्यासाठी आधार आणि पॅन आवश्यक आहे. काही काळापूर्वी ई-केवायसी बाबतचे मुख्य परिपत्रक आरबीआयने अपडेट केले होते. या नवीन परिपत्रकानुसार नवीन बँक खात्यासाठी आधार आणि पॅन क्रमांक देणे बंधनकारक असेल.

? काय प्रकरण आहे?

SBI च्या एका वापरकर्त्याने ट्विटर हँडलवर एक प्रश्न विचारला की, एसबीआय शाखेत खाते उघडण्यासाठी गॅरेंटर आवश्यक आहे की फक्त आधारवर काम चालेल. यावर बँकेने म्हटले आहे की, बँक खाते उघडण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. तसेच केवायसी अनिवार्य आहे. याविषयी अधिक माहितीसाठी बँकेने काही लिंकही शेअर केल्यात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून सांगण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बँकेत बचत बँक खाते उघडायचे असेल तर त्याला या कागदपत्रांची आवश्यकता असेल. बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्ही बँकेतून मिळालेला फॉर्म भरून आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमचे खाते उघडू शकता.

? ही कागदपत्रे आवश्यक असतील

?पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 ?फोटो ?अधिकृत वैध दस्तऐवज (OVD) पैकी कोणत्याही एकाची प्रत

? अजून कोणकोणती कागदपत्रे लागणार

?या व्यतिरिक्त तुम्ही यापैकी कोणत्याही एका दस्तऐवजाचा वापर खातेधारकाची ओळख आणि वर्तमान पत्त्यासाठी करू शकता- ?पासपोर्ट ?चालक परवाना ?आधार कार्ड ?मतदार ओळखपत्र ?राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले मनरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड ?नाव आणि पत्त्याची माहिती असलेले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे जारी केलेले पत्र. ?जर अद्ययावत पत्ता नसेल तर तुम्ही ही कागदपत्रे वापरू शकता. ?वीज बिल, टेलिफोन बिल, मोबाईल पोस्ट पेड बिल, गॅस पाईपलाईन बिल किंवा पाण्याचे बिल यांसारखी उपयुक्तता बिले. परंतु हे लक्षात ठेवा की ही बिले दोन महिन्यांपेक्षा जास्त जुनी नसावीत. ?मालमत्ता किंवा नगरपालिकेची कर पावती ?पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) जे सरकारकडून सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जारी केले जातात. ?राज्य किंवा केंद्र सरकारच्या विभागांनी जारी केलेल्या निवासस्थानाशी संबंधित पत्रे.

?बचत खात्याचा फायदा काय?

बचत खात्याचा वापर कोणत्याही व्यक्तीने बँकेत वैयक्तिक कामासाठी जमा केलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. बचत खाते हे असे खाते आहे, ज्यात खातेधारकाने जमा केलेले पैसे देखील बँकेने निश्चित केलेले व्याज प्राप्त करतात, जे 2% ते 6% पर्यंत असू शकतात.

संबंधित बातम्या

व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; ‘या’ 8 मोठ्या बँका होणार प्रभावित

‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 10 हजारांचे वर्षभरात झाले 2.30 लाख

Do you need a guarantor or just support to open an account in SBI? The answer given by the bank

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.