जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांच्यावर एका महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत ‘बिझनेस इनसाइडर’च्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. या दाव्यानुसार संबंधित महिला ही एलन मस्क यांच्या एरोस्पेस कंपनी स्पेसएक्समध्ये (SpaceX) फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. या महिलेने एलन मस्क यांच्यावर लौंगिक शोषणाचा आरोप केला. आरोप झाल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी एलन मस्क यांनी संबंधित महिलेला 2018 साली दोन कोटी रुपये देखील दिल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. आता यावर मस्क यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिझनेस इनसाइडर’च्या रिपोर्टनुसार संबंधित महिला ही स्पेसएक्समध्ये कंत्राटी कर्मचारी होती. या महिलेने मस्क यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच मसाजच्या (Massage) मोबदल्यात आपल्याला एक घोडा खरेदी करून देऊ अशी ऑफर देखील मस्क यांनी दिल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला होता.
रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हे सर्व प्रकरण 2016 मधील आहे. या महिलेने आपल्या मित्रांना सर्वप्रथम या प्रकाराबाबत माहिती दिली. जेव्हा आपण फ्लाइट अटेंडंट म्हणून जॉबला सुरुवात केली तेव्हा आपल्याला मसाज प्रोफेशनसाठी आवश्यक असलेले लायन्सस घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. मला प्रोत्साहन यासाठी देण्यात आले की, मी मस्क यांची मसाज करू शकेल. त्यानंतर एक दिवस मस्क यांच्या प्रायव्हेट कॅबीनमध्ये त्यांची मसाज सुरू असताना त्यांनी आपल्याकडे सेक्सची मागणी केल्याचे या महिलेने म्हटले आहे. त्यानंतर संबंधित महिलेने मस्क यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एका वकिलासोबत चर्चा देखील केली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचलेच नाही. 2018 मध्ये या प्रकरणात मस्क आणि संबंधित महिलेमध्ये एक करार झाला. या करारानुसार संबंधित महिलेला दोन कोटी रुपये देण्यात आले. तसेच संबंधित प्रकरणाबाबत गुप्तता ठेवण्यासही सांगण्यात आले. असा दावा देखील बिझनेस इनसाइडरने आपाल्या रिपोर्टमध्ये केला आहे.
The attacks against me should be viewed through a political lens – this is their standard (despicable) playbook – but nothing will deter me from fighting for a good future and your right to free speech
— Elon Musk (@elonmusk) May 20, 2022
या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार जेव्हा मस्क यांना या प्रकरणाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर मी अशा प्रकरणात दोषी असेल तर माझ्यावर गेल्या तीस वर्षांच्या करीयरमध्ये एकदाही आरोप का झाले नाहीत? माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकारणाने प्रेरित असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. या प्रकरणात मस्क यांनी एक ट्विट देखील केले आहे. मस्क यांनी म्हटले आहे की, माझ्यावर जे आरोप झाले आहेत त्याकडे एक प्रकारचे राजकारण म्हणून पहाण्यात यावे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. मला फ्री स्पीचच्या लढाईपासून कोणही रोखू शकत नाही.