नवी दिल्लीः श्रीनगरमधील ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (सीबीटी) च्या बैठकीत व्याजदराबाबत निर्णय घेण्यात आलाय. मनी 9 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत 2020-21 च्या व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते व्याजदर 8.5 टक्क्यांवरच स्थिर आहेत. ईपीएफ म्हणजे नोकरी करणार्या व्यक्तीच्या पगारामध्ये एक आवश्यक योगदान आहे. 20 हून अधिक कर्मचार्यांना नोकरी देणार्या कोणत्याही कंपनीला त्या कर्मचार्याचा ईपीएफ वजा करावा लागतो. तर कोणताही सामान्य भारतीय नोकरदार ईपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. (Epfindia Employees Provident Fund Organisation Epf Interest Rate 2020-21 Unchanged Maintains 8.5 Percent For Fy 21)
बोर्डाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी मनी 9 ला सांगितले. ईपीएफओच्या वेगवेगळ्या स्रोतांच्या गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित या समितीने व्याजदरासाठी आढावा अहवाल सादर केला. हे पाहता व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाने अद्याप घेतलेला नाही. ईपीएफओ बोर्ड आता आपल्या शिफारशी वित्तमंत्र्यांकडे पाठवणार आहे. त्यानंतरच त्यावर निर्णय होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे माजी सहाय्यक आयुक्त ए. के. शुक्ला यांच्या मते, 6.5 कोटी लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मात्र, आता या शिफारसी वित्त मंत्रालयाकडे पाठवल्या जातील. मंत्रालयाने त्यांना स्वीकारल्यास त्याची अधिसूचना जारी केली जाईल. तसे न केल्यास या शिफारसी पुन्हा सीबीटी बोर्डाकडे पाठविल्या जातील. यानंतर बोर्ड त्यावर पुन्हा विचार करेल आणि ते वित्त मंत्रालयाकडे पाठवेल.
आर्थिक वर्ष | व्याजदर (%) |
---|---|
2012-13 | 8.5 |
2013-14 | 8.75 |
2014-15 | 8.75 |
2015-16 | 8.8 |
2016-17 | 8.65 |
2017-18 | 8.55 |
2018-19 | 8.65 |
2019-20 | 8.50 |
अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर त्याची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. यानंतर सर्व नोकरदारांच्या खात्यावर व्याज हस्तांतरित केले जाईल.
नोकरीच्या पगारामधून वजा केलेली रक्कम दोन खात्यात जाते. पहिला भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ आणि दुसरा पेन्शन फंड म्हणजे ईपीएस. यामध्ये एकूण रकमेपैकी 12 टक्के रक्कम ईपीएफ कर्मचार्याच्या वतीने जमा केली जातात. त्याचबरोबर कंपनीच्या वतीने 3.67 टक्के ईपीएफमध्ये जमा असतो. उर्वरित 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जमा आहेत. दरमहा जास्तीत जास्त 1,250 रुपये मर्यादा आहे.
ईपीएफओने मार्च 2020 मध्ये आर्थिक वर्ष 2019-20 च्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत कमी केले. गेल्या सात वर्षातील हे सर्वात कमी व्याज आहे. 2012-13 मध्ये यापूर्वी व्याजदर 8.5 टक्के होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ ठेवींवर सदस्यांना 8.65 टक्के व्याज मिळाले. ईपीएफओने 2016-17 मध्ये पीएफ ठेवींवर 8.65 टक्के, 2017-18 साठी 8.55 टक्के आणि 2015-16 मध्ये ग्राहकांना 8.8 टक्के व्याज दिले होते. त्याचबरोबर 2013-14 मध्ये पीएफ ठेवींवर 8.75 टक्के व्याज दिले गेले होते, जे 2012-13 या आर्थिक वर्षात 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होते.
संबंधित बातम्या
6 कोटी लोकांसाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदर कमी होणार; ‘या’ दिवशी घोषणा
आता घर बसल्या PF अकाऊंट ऑनलाईन करा ट्रान्सफर, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस
Epfindia Employees Provident Fund Organisation Epf Interest Rate 2020-21 Unchanged Maintains 8.5 Percent For Fy 21