Forbes India Rich List 2020 | श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींचं अव्वल स्थान कायम, पहिल्या दहामध्ये कोण-कोण?

गौतम अदानी(Gautam Adani) यांचे दुसर्‍या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत तिसरे व्यक्ती म्हणजे शिव नादर(Shiv Nadar) असून त्यांच्याकडे 20.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:16 PM, 8 Oct 2020

नवी दिल्लीः 2020च्या पहिल्या 100 श्रीमंत भारतीयांची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, पहिल्या 100च्या यादीतील भारतीयांनी एकूण 517.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे. गेल्या वर्षी फोर्ब्सच्या यादीमध्ये सामील झालेल्या लोकांच्या मालमत्तेपेक्षा हा आकडा 14 टक्के जास्त आहे. एवढेच नव्हे तर बर्‍याच नवीन नावांनीही या यादीमध्ये आपले स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आहेत.(forbes india rich list 2020 )

त्याच्याकडे 88.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. गौतम अदानी(Gautam Adani) यांचे दुसर्‍या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत तिसरे व्यक्ती म्हणजे शिव नादर(Shiv Nadar) असून, त्यांच्याकडे 20.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी(Radhakishan Damani) आहेत. दमानी यांच्याकडे 15.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. हिंदुजा बांधव(Hinduja brothers) पाचव्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 12.8 अब्ज डॉलर्स आहे. सायरस पूनावाला(Cyrus Poonawalla) 11.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. पालनजी मिस्त्री(Pallonji Mistry) सातव्या क्रमांकावर आहेत. त्याच्याकडे 11.4 अब्ज डॉलर्स आहेत. उदय कोटक 11.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहे. गोदरेज फॅमिली (Godrej Family) 9व्या स्थानावर आहे, त्यांची संपत्ती 11 अब्ज डॉलर्स आहे. दहाव्या क्रमांकावर लक्ष्मी मित्तल असून, त्यांची संपत्ती 10.3 अब्ज डॉलर्स आहे.

…म्हणून मुकेश अंबानीची संपत्ती वाढली

एकीकडे कोरोना साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व उद्योगांची अवस्था बिकट झाली आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्तीही कोरोना काळात वाढली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन झाल्यापासून मुकेश अंबानींनी आतापर्यंत प्रत्येक तासाला 90 कोटींची कमाई केली आहे.

कोरोना काळात मुकेश अंबानींना जिओनं मोठा फायदा मिळवून दिला आहे. मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 2 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. मुकेश अंबानी यांची गुंतवणूक वाढवण्याची प्रक्रिया अद्याप रिलायन्स रिटेलमधून सुरूच आहे. डिजिटलनंतर मुकेश अंबानी आता रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून परकीय भांडवल उभारत आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे इतर कंपन्यांची अवस्था खराब असताना अंबानींना आर्थिक बळकटी मिळाली आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं

Mukesh Ambani | मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत, एकूण संपत्ती किती?

(forbes india rich list 2020 )