सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, कोरोनाची नवीन लस (Corona Vaccine) येत असल्याच्या बातम्यांचा परिणाम बाजारावर होत आहे.

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

नवी दिल्लीः दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या भाव 248 रुपये आणि चांदीचा भाव 853 रुपयांनी घसरला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, कोरोनाची नवीन लस (Corona Vaccine) येत असल्याच्या बातम्यांचा परिणाम बाजारावर होत आहे. (Gold And Silver Price Down On Bullion Market On Thursday)

सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 248 रुपयांनी घसरला असून, 49,714 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर 853 रुपयांनी घसरला असून, 61,184 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. मागील सत्रात सोन्याचे दर अनुक्रमे 49,962 आणि चांदीचा भाव प्रतिकिलो 62,037 होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कम्युनिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले, दिल्ली सराफा स्पॉट मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 248 रुपयांनी घसरून 50,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रात्रंदिवस होत असलेल्या सोन्याच्या विक्रीचा परिणाम बाजारावर झाला आहे. “मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी मार्केट रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, कोरोनाची लस विकसित होणाऱ्या बातम्यांनी सोन्याकडे गुंतवणूकदारांचे काहीसे दुर्लक्ष झाले आहे.

कोरोनाच्या काळात तेलाच्या किमतीतील ऐतिहासिक घसरणीनंतर गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित समजतात. गेल्या महिन्यांत देशांतर्गत बाजारात त्याचे दर प्रति 10 ग्रॅम 55,000 रुपयांपेक्षा जास्त वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,861 डॉलर आणि चांदी प्रति औंस 24,02 डॉलरवर घसरले.

विशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण (Corona Pandamic) काळानंतर आता लोकांनी दिवाळीचं (Diwali) मोठं उत्साहात स्वागत केलं. कारण, धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली होती. IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात होती.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सुमारे 12,000 कोटी रुपये सोन्याची विक्री झाली होती. पण या वर्षी कोरोनासारख्या कठीण काळातही हा आकडा 20,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 30 टन सोनं विकलं गेल्याची माहिती आहे. तर यंदा 40 टन सोन्याची विक्री झाली असल्याची माहिती सुरेंद्र मेहता यांनी दिली होता.

इतर बातम्या 

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *