Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

फेब्रुवारीबद्दल बोलायचे झाल्यास केवळ 20 दिवसांत सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Rate)प्रचंड घसरण झालीय. लग्नाच्या हंगामापूर्वी अवघ्या 20 दिवसांत सोन्याच्या किमती 10 ग्रॅम प्रति 3292 रुपयांपर्यंत खाली आल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:50 PM, 21 Feb 2021
Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?
Gold Rate Today

नवी दिल्ली: यंदा लग्नाच्या हंगामाला अजून महिना शिल्लक आहे. सध्या मोजकेच विवाहसोहळे होत आहेत. एप्रिल महिन्यात विवाहसोहळ्यांसाठी बरेच मुहूर्त असून, त्या काळात अनेक लग्नकार्ये पार पडणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात सोने-चांदीच्या किमती मार्च महिन्याच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. परंतु जर फेब्रुवारीबद्दल बोलायचे झाल्यास केवळ 20 दिवसांत सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Rate)प्रचंड घसरण झालीय. लग्नाच्या हंगामापूर्वी अवघ्या 20 दिवसांत सोन्याच्या किमती 10 ग्रॅम प्रति 3292 रुपयांपर्यंत खाली आल्यात. त्याचबरोबर चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास चांदीची किंमत गेल्या वर्षीच्या किमतीच्या तुलनेत 7,594 रुपये प्रति किलो स्वस्त झालीय. (Gold Rate Fell By Rs 3,292 In The First 20 Days Of February; Will It Be Cheaper Or More Expensive In The Coming Weeks?)

विशेष म्हणजे आज सकाळच्या शेवटच्या व्यापार सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या किंमती वाढीसह बंद झाल्या. एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 64 रुपयांनी वाढून 46,190.00 रुपयांवर गेला होता. त्याचबरोबर चांदीचा वायदा भाव 420 रुपयांनी वाढून 68,914 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत होता.

बुलियन बाजारात सोन्याच्या भावात चढ-उतार

बुलियन बाजारात (Bullion Market) सोने-चांदीच्या किमती फ्युचर्स ट्रेडिंगवर आधारित असतात. वास्तविक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमती अगदी तंतोतंत राहत नाहीत, तर पुढे आणि मागे सरकत राहतात. वास्तविक जर मागील 20 दिवसांत सोन्या (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 3292 रुपयांनी घसरण झाली असेल तर गेल्या एका आठवड्यात ही घसरण प्रति 10 ग्रॅम 1285 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत मागील आठवड्यापेक्षा किरकोळ वाढली आहे. चांदीच्या भावात 37 रुपयांची वाढ झालीय.

15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सोन्याच्या किमतीत काय फरक?

7 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत (Gold Price) सर्वाधिक होती, जेव्हा सोन्याने 56,254 ची उच्च पातळी गाठली होती. परंतु मागील आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास 12 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचा भाव 47,386 वर बंद झाला. म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी सोने 142 रुपयांनी स्वस्त झाले आणि 21 फेब्रुवारीला सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 46,190.00 रुपयांवर आले. म्हणजे आठवड्यात 1196 रुपयांची घसरण नोंदली गेली.

22 ते 28 फेब्रुवारी सोन्याचा भाव काय राहील?

देशात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्यानं सोन्याच्या भावातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीकरण सुरू असले तरी त्याचा सोन्याच्या दरावर फारसा प्रभाव पडणार नसल्याचं जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीने व्यापार करतेय. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 8.86 डॉलरने घसरून 1,767.93 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. चांदीची किंमत 0.33 डॉलरने घसरून 26.66 डॉलरवर पोहोचली आहे. पण येत्या आठवड्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदीला भारतामध्ये मोठी पसंती आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास पोहोचले तरी नागरिक ते नक्कीच खरेदी करतील. लोक सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोन्याच्या किमती जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतात

भारतात सोन्याला मोठी मागणी आहे, परंतु त्याची किंमत जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. एकीकडे संपूर्ण जग वर्ष 2020 मध्ये कोरोना साथीशी दोन हात करत होते. तर दुसरीकडे सोनं सतत विक्रम नोंदवत होते. वर्ष 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर जागतिक पातळीवर सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली. खरं तर कोरोना महामारीमुळे, गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटपेक्षा सराफामध्ये जास्त गुंतवणूक केली. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता भविष्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे.

उच्च स्तरापेक्षा आतापर्यंत सोनं 9500 रुपयांनी स्वस्त

ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत 56,000 रुपयांच्या पातळीवर गेली. त्या दृष्टीने सोने सुमारे 9500 रुपयांनी स्वस्त झाले. त्याच वेळी जेव्हा चांदीची किंमत 78000 च्या पातळीवर पोहोचली होती. त्या दृष्टीने ते 10 हजार रुपयांनी घसरले. 2021 च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी सोन्या-चांदीवरील आयात शुल्क 12.50 वरून 7.5 टक्क्यांवर आणले. त्यावर 2.5 टक्के (वेगळा कर प्रमाणे) उपकर लावण्यात आला. अशा प्रकारे निव्वळ 2.5 टक्के ग्राहकांना फायदा झाला. या घोषणेनंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घट झाली.

संबंधित बातम्या

Gold Silver Rate Today : अरे व्वा! सोने आणि चांदी पुन्हा एकदा 1274 रुपयांनी स्वस्त; पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold Price Today: 717 रुपयांनी स्वस्त झालेलं सोने पुन्हा एकदा महागले; जाणून घ्या तोळ्याचा भाव

Gold Rate Fell By Rs 3,292 In The First 20 Days Of February; Will It Be Cheaper Or More Expensive In The Coming Weeks?