नवी दिल्लीः अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजारही कोसळलाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत असल्यानं आज त्याच्या सोन्या-चांदीच्या दरावरही परिणाम झाल्याचं चित्र आहे. अमेरिकन बाँड यील्डमधील वाढ झालीय. त्यामुळे सोन्याच्या दरात दहा ग्रॅम 278 रुपये आणि चांदीच्या दरात 265 रुपये वाढ नोंदवली गेलीय. आज सोन्याच्या भाव तेजीनं प्रति तोळा 46,013 रुपयांवर बंद झाला असून, चांदी प्रतिकिलो 68,587 रुपयांवर बंद झाली. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 45,735 रुपये, तर चांदीचा भाव 68,322 रुपये प्रति किलो होता. (Gold Gains 278 Rupees And Silver Shine 265 Rupees 22 February After Sensex Lost 1145 Point)
आज डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 16 पैशांची वाढ नोंदली गेलीय आणि तो 72.49 च्या पातळीवर बंद झाला. आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळलाय. 30 शेअर असलेला निर्देशांक सेन्सेक्स 1145 अंकांच्या घसरणीसह (-2.25%) 49,744 पातळीवर बंद झाला आणि 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 306 अंकांसह (-2.04%) खाली कोसळत 14675 वर बंद झाला. 16 फेब्रुवारीपासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली, जी सतत सुरू आहे. तीन आठवड्यांत प्रथमच सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली आलाय. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य आता 200.19 लाख कोटींवर आलेय. गेल्या आठवड्यात ती 203.98 लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे आज गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटींचे नुकसान झाले.
यावेळी सुवर्ण डिलिव्हरीमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सायंकाळी 6.35 वाजता एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 389 रुपयांनी वधारून 46586 रुपये प्रति दहा ग्रॅम होता आणि जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 325 रुपयांनी वाढून 46665 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 19.25 (+ 1.08%) वाढीसह 1,796.65 डॉलर प्रति औंसवर होता.
सध्या एमसीएक्सवर चांदीच्या डिलिव्हरीमध्येही तेजी पाहायला मिळालीय. चांदीचा भाव 427 रुपयांनी वाढून 69439 रुपये प्रतिकिलो होता. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठी चांदी 393 रुपयांनी वाढून 70552 रुपये प्रतिकिलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही चांदीची तेजी दिसून येत आहे. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत यावेळी 0.26 डॉलर (+ 0.96%) वाढीसह 27.51 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होता.
संबंधित बातम्या
‘या’ बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार
Gold Gains 278 Rupees And Silver Shine 265 Rupees 22 February After Sensex Lost 1145 Point