Gold : सोने खरेदीचा विचार करताय; ‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा अन्यथा…

यंदा सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करीत असल्यास अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:46 AM, 25 Jan 2021
Gold : सोने खरेदीचा विचार करताय; 'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा अन्यथा...

नवी दिल्ली : सोन्याच्या किमतींमध्ये बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. वर्ष 2020 मध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढीनंतर सोन्याच्या किमती अजूनही वाढण्याची अपेक्षा आहे. सोने हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्यासाठी तज्ज्ञ म्हणतात की, प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या गरजेनुसार गुंतवणूक करायला हवी. आपण यंदा सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करीत असल्यास अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (Gold If You Are Thinking Of Buying Then Pay Attention To These Things First)

नव्या अमेरिकन अध्यक्षांचा निर्णय

जो बायडेन यांनी अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय. यानंतर गुंतवणूकदारांना मोठ्या मदत पॅकेजची अपेक्षा आहे. परंतु अशा उपाययोजनांमुळे सोन्याच्या किमती वाढतील, कारण सोने हे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय आहे.

सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी केवायसीची गरज नाही

आता दोन लाख रुपयांपेक्षा कमी दागदागिने खरेदी करण्यासाठी केवायसीची आवश्यकता नसल्याने यातून ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. मागणी घटल्याने सोन्याच्या किमतींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे सोन्याच्या मागणीतही वाढ दिसून येत आहे, त्यामुळे किंमती वाढतील.

कोविड 19 लसीचा प्रभाव

भारतात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे आणि त्याच्या यशाने सर्व बाजूंनी सकारात्मकतेने जलद आर्थिक पुनर्प्राप्ती होतेय. याद्वारे गुंतवणूकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये आपले पैसे गुंतवू शकतात. शेअर बाजाराची वेगवान गती लक्षात घेत गुंतवणूकदार आधीच तिकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत.

डॉलर मजबूत होतोय

येत्या काही दिवसांत डॉलर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण सोने आणि डॉलर विरुद्ध दिशेने प्रवास करतात. मध्यवर्ती बँकांमध्ये सोन्याची विक्रमी होल्डिंग, उच्च जागतिक कर्ज आणि गुंतवणुकीची उच्च मागणीसुद्धा सोन्यासाठी चांगली आहे. म्हणजेच हे सर्व घटक सोन्याचा वाढण्यास कारणीभूत ठरतात.

लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी:

– गुंतवणूकदारांनी सोन्याकडे गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहिले पाहिजे, दबावाच्या वेळी सोन्यातून चांगले उत्पन्न मिळते.
– सोन्याला मालमत्ता वर्ग म्हणून पाहिले पाहिजे, जे चांगलं उत्पन्न मिळविण्यात मदत करते.
– दर खाली येताना सोन्यात खरेदी करा आणि तेही टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक आहे. 22 जानेवारी 2021 ला एमसीएक्सवरील सोन्याची किंमत 258 रुपये किंवा 0.5 टक्क्यांनी वाढून 49,190 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. कोरोनामुळे 2020 मध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात घसरली, त्यातून चांगला परतावाही मिळाला.

संबंधित बातम्या

आठवडा संपता संपता, सोन्याचे दर घसरले; वाचा काय आहेत आजचे भाव

Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Gold If You Are Thinking Of Buying Then Pay Attention To These Things First