फक्त 500 रुपयांत सोने खरेदी करा आणि मिळवा उत्तम परतावा, जाणून घ्या सर्वकाही

Gold bond | सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असली तरी लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. गुंतवणुकीच्या बाबतीत, सोने हा एक सुरक्षित पर्याय आहे. एका चांगल्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 15-20 टक्क्यांपर्यंत असावा, असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.

फक्त 500 रुपयांत सोने खरेदी करा आणि मिळवा उत्तम परतावा, जाणून घ्या सर्वकाही
सोन्यात गुंतवणूक
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 12:01 PM

मुंबई: भारतीयांना सोन्याविषयी असणारे आकर्षण ही काही नवी बाब नाही. आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला (Gold) प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचा दर हा गगनाला भिडल्याने या धातूला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अजूनही लोक मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करताना दिसतात.

सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असली तरी लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. गुंतवणुकीच्या बाबतीत, सोने हा एक सुरक्षित पर्याय आहे. एका चांगल्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 15-20 टक्क्यांपर्यंत असावा, असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे. सोन्याला इतर पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते.

चांगला परतावा मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे. येथे गुंतवणूक करून, तुम्हाला भौतिक सोन्याप्रमाणे सोन्याच्या देखभालीची काळजी करण्याची गरज नाही. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत ज्यांनी FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

अवघ्या 500 रुपयांत खरेदी करु शकता सोनं?

म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते. अॅक्सिस गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड फंड आणि एचडीएफसी गोल्ड फंड हे काही गोल्ड फंड आहेत जे चांगले परतावा देत आहेत.

कोटक गोल्ड फंड

म्युच्युअल फंड योजनांमध्ये, कोटक वर्ल्ड गोल्ड फंड हा एक आंतरराष्ट्रीय फंड आहे जो सोन्याच्या खाण कंपन्या आणि त्याचे विपणन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या योजनांचे परतावे सोन्याच्या दैनंदिन हालचालीशी जोडलेले आहेत. म्हणून, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्याने पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) किंवा पद्धतशीर हस्तांतरण योजना (STP) वापरावी. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड उत्पादन आहे, जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. असे अनेक गोल्ड फंड आहेत, ज्यांनी अवघ्या 3 वर्षात 14 ते 15 टक्के परतावा दिला आहे.

संबंधित बातम्या:

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.