Gold Price Today: सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, झटपट तपासा नवे दर

देशात वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लोक सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणे टाळत आहेत. ज्यामुळे बाजारात मागणी सातत्याने कमी होत आहे आणि त्यांचे दर कमी होत आहेत. Gold Price Today

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:34 PM, 20 Apr 2021
Gold Price Today: सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, झटपट तपासा नवे दर
Gold Price Today

नवी दिल्ली: सोने आणि चांदीच्या किमती आज पुन्हा एकदा घसरल्यात. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव (Gold Rate Today) 305 रुपयांनी घसरून 46,756 रुपयांवर आला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Silver Rate Today) 113 रुपयांची घसरण झाली. सोन्या-चांदीच्या किमतीतील ही घट भारतातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे होत आहे. कारण यावेळी देशात वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लोक सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणे टाळत आहेत. ज्यामुळे बाजारात मागणी सातत्याने कमी होत आहे आणि त्यांचे दर कमी होत आहेत. (Gold Price Today: Gold And Silver Rate 20 April 2021 Once Again Became Cheaper, Check Out The New Rates)

अमेरिकन बाँडमधील घट आता सावरण्यास सुरुवात

जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस 1,768 अमेरिकन डॉलर्स आणि चांदीचे दर प्रति औंस 25.09 डॉलरवर पोहोचलेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी अमेरिकन बाँडमधील घट आता सावरण्यास सुरुवात झालीय. ज्यामुळे जगात सोन्या चांदीच्या किमतीत घट होत आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, भारतात मागणी नसल्यामुळेही घट होत आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

असे होते पूर्वीचे दर

सोमवारी व्यवसायाच्या शेवटी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47,061 रुपये आणि चांदीचा भाव प्रतिकिलो 67,810 रुपये बंद झाला होता. त्याचबरोबर सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) उघडल्यानंतर वायदा सोन्याच्या किमतीत 0.29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली होती. त्याच वेळी, चांदी (Silver Price Today) थोड्याशा वाढीसह व्यापार करीत होती. वायदा चांदीच्या किमतीत (Silver Price) 0.45 टक्क्यांनी वाढ झाली. एमसीएक्सवर फ्युचर्स चांदीचा भाव 225 रुपयांनी वाढून 68,635 रुपये प्रतिकिलो राहिला. पण संध्याकाळपर्यंत चांदीच्या भावातही घट दिसून आली.

सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून

सोन्याची किंमत ठरविणार्‍या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.

मार्चमध्ये सोन्याची आयात वाढली

भारत सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सोन्याच्या मागणीपैकी 70 ते 80 टक्के मागणी अन्य देशांमधून आयात केली जाते. मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये आयात शुल्काची घट आणि किमती कमकुवत झाल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर गेली होती. gold price today gold and silver rates fall check latest prices

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

Gold Price Today: Gold And Silver Rate 20 April 2021 Once Again Became Cheaper, Check Out The New Rates