Gold Price Today: सोने पुन्हा महागले, चांदीच्या किमतीतही वाढ, खरेदी करण्यापूर्वी दर नक्की पाहा

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याची स्पॉट प्राइसमध्ये वाढ नोंदविण्यात आली, तर चांदीच्या भावातही किरकोळ वाढ झाली. Gold Price Today 3 may 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:33 PM, 3 May 2021
Gold Price Today: सोने पुन्हा महागले, चांदीच्या किमतीतही वाढ, खरेदी करण्यापूर्वी दर नक्की पाहा
Gold price today 07 may 2021

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) झालेल्या सुधारणामुळे आज 3 मे 2021 रोजी भारतीय बाजारपेठेत मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली. त्याचबरोबर चांदीची किंमत (Silver Price Today) देखील वाढली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,270 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रति किलो 66,849 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याची स्पॉट प्राइसमध्ये वाढ नोंदविण्यात आली, तर चांदीच्या भावातही किरकोळ वाढ झाली. (Gold Price Today: Gold rises 3 may 2021 again, silver rises again, check gold rate silver rate )

सोन्याचे नवीन दर (Gold Price, 3 May 2021)

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रति 310 रुपयांनी वाढली. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम, 46,580 रुपये झाली. ट्रेडिंग सेशनच्या आधी सोन्याचा दर 10 ग्रॅम 46,270 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 1,777 डॉलर प्रति औंसवर गेली.

चांदीचा नवीन दर (Silver Price, 3 May 2021)

चांदीच्या किमती आज तेजीत आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी चांदीचे दर प्रतिकिलो 580 रुपयांनी वाढून 67,429 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रतिकिलो 66,849 रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या भावात किंचित वाढ नोंदविण्यात आली आणि औंस प्रति डॉलर 26.06 पर्यंत पोहोचला.

सोने-चांदीत तेजी कशासाठी?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या स्पॉट किमतीत वाढ झाली. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला. याखेरीज अन्य देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कमकुवततेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीही मजबूत होत्या. परंतु आजच्या सुरुवातीच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत 24 पैशांनी घसरून 74.33 वर आला.

सोन्याच्या किंमत 60 हजारांच्या पुढे जाणार!

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील कोरोना संकटामुळे अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लॉकडाऊन होणार की नाही, अशी भीती लोकांना अजूनही आहे. त्याचबरोबर दुसरीकडे महागाई देखील वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत या घटकांचा परिणाम सोन्याच्या दरावर होणार आहे. याच कारणामुळे पुढील 5-6 महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते. अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पसंती देतात.

सोन्यात चढ-उतार का?

गेल्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 4 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याला पाठिंबा मिळालाय. या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन बॉन्ड यील्डच्या सोन्याच्या भावात वाढ झाली असून, सेप-हेवन मालमत्तेला धक्का बसलाय. परंतु अमेरिकी बाँडच्या उत्पन्नातील कमकुवतपणा आणि अमेरिकन डॉलरच्या नरमपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या.

दागिन्यांची मागणी वाढली

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च 2020 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची एकूण मागणी 39 टक्क्यांनी वाढून 102.5 टन झाली. एका वर्षापूर्वी ते 73.9 टन होते, जर आपण या किमतीबद्दल बोललो तर दागिन्यांची मागणी मागील वर्षीच्या 27,230 कोटी रुपयांच्या तुलनेत 58 टक्क्यांनी वाढून 43,100 कोटी रुपये झाली.

संबंधित बातम्या

Axis Bank कडून चांगले पैसे कमावण्याची संधी, 10 मेपर्यंत करा गुंतवणूक

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीची मोठी उसळी, पटापट जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Price Today: Gold rises 3 may 2021 again, silver rises again, check gold rate silver rate