कोरोना लसीच्या बातमीनं सोने दरात घसरण, 5 दिवसांत सोने किती रुपयांनी घसरलं?

सोन्याच्या दर प्रतितोळा 1000 रुपयांपेक्षा जास्त खाली आला. (Corona Vaccine Gold Rate )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:03 PM, 24 Nov 2020

नवी दिल्लीः कोरोना लसीच्या  ( Corona Vaccine ) निर्मितीत होणा-या प्रगतीच्या बातमीमुळे सोनं दिवसेंदिवस स्वस्त होत चाललं आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोन्याच्या ( Gold Rate) भावात घसरण सुरू आहे, तर शेअर बाजारात तेजी आहे. 19 नोव्हेंबरपासून सोन्याच्या किमती प्रतितोळा 1000 रुपयांपेक्षा जास्त खाली आल्या आहेत. (Gold Rate Reduced After Corona Vaccine News)

देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याची किंमत पुन्हा प्रति 10 ग्रॅम 50,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे आणि चांदीदेखील जवळपास तीन टक्क्यांनी घसरून 60,300 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारी सोन्याच्या भावात दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर चांदी तीन टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली.

सोन्याच्या भावात पाच टक्क्यांपर्यंत घसरण

कोरोना लसीतील प्रगतीच्या बातमीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घटल्या आहेत. यापूर्वी 9 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट कॉमेक्सवरील सोन्याच्या किमती एका दिवसात सुमारे 100 डॉलर्स म्हणजेच पाच टक्क्यांनी घसरल्या. त्यावेळीसुद्धा कोरोना लसीच्या प्रगतीच्या बातमीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाली होती.

तज्ज्ञ काय म्हणतात

अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, लसीच्या प्रगतीची बातमी आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर 9 डिसेंबर रोजी रात्री 9.16 वाजता प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव मागील सत्राच्या तुलनेतील डिसेंबरचा वायदा भाव 784 म्हणजेच 1.56 टक्के घसरणीसह 49,428 रुपयांवर व्यापार करत होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनासारख्या साथीचा सामना करत असताना आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत पॅकेजची घोषणा करण्यात आली, त्यामुळे सोन्याला आधार मिळाला, तर दुसरीकडे कोरोना लसीच्या प्रगतीचा अहवाल आल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. gold prices reduced after corona vaccine news

एमसीएक्सच्या किमतीही आल्या खाली

एमसीएक्स चांदीचा डिसेंबरचा वायदा भाव 1,677 किंवा 2.70 टक्क्यांनी घसरून 60,481 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता. डिसेंबरचा सोन्याचा दर आधीच्या सत्राच्या तुलनेत 39 रुपये किंवा 2.08 टक्क्यांनी कमी होऊन 1,833.40 डॉलर प्रतिऔंसवर व्यापार करत होता. त्याच वेळी चांदी डिसेंबरच्या व्यापारामध्ये 3.29 टक्क्यांनी कपातीसह 23.56 डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत होती.

कोरोना युगात सोने महागले

जगभरातील कोरोनाचा वाढता धोका रोखण्यासाठी उपाय म्हणून लॉकडाऊन, आर्थिक हालचालींवर निर्बंध लादण्यात आले. त्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून स्वीकारले, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. कॉमेक्सवरील सोन्याची किंमत प्रति औंस 2,089 डॉलर इतकी ऐतिहासिक उच्च पातळीवर गेली होती आणि 7 ऑगस्टला भारतातील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांवर गेली होती. gold prices reduced after corona vaccine news

gold prices reduced after corona vaccine news

संबंधित बातम्या

मोठा धक्का! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या…

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स