दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं!

नवी दिल्ली: सणासुदीच्या तोंडावर सोने दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोने दरात बुधवारी 31 ऑक्टोबरला 30 रुपयांची वाढ होऊन, प्रतितोळ्याचा दर 32 हजार 650 रुपयांवर पोहोचला. जवळपास सहा वर्षानंतर सोने दराने गाठलेला हा उच्चांक आहे. दुसरीकडे चांदी दरात मात्र कपात होत आहे. चांदी दरात बुधवारी 40 रुपयांची कपात झाल्याने, प्रतिकिलोचा दर 39 हजार 200 रुपये …

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं!

नवी दिल्ली: सणासुदीच्या तोंडावर सोने दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोने दरात बुधवारी 31 ऑक्टोबरला 30 रुपयांची वाढ होऊन, प्रतितोळ्याचा दर 32 हजार 650 रुपयांवर पोहोचला. जवळपास सहा वर्षानंतर सोने दराने गाठलेला हा उच्चांक आहे. दुसरीकडे चांदी दरात मात्र कपात होत आहे. चांदी दरात बुधवारी 40 रुपयांची कपात झाल्याने, प्रतिकिलोचा दर 39 हजार 200 रुपये इतका झाला. हा दिल्ली बाजारातील दर आहे.

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांकडून मागणी वाढली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. दिवाळी, पाडवा या निमित्ताने सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. त्याचाच परिणाम मार्केटमध्ये सोने दराने नवी झळाळी घेतली आहे.

गेल्या आठवड्यात सोने दराने 32625 इतका उच्चांक नोंदवला होता. मात्र आता त्यापुढे मजल मारता नवा विक्रम नोंदवला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *