Gold Rate Today: लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीत तेजी, झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे भाव

चांदीच्या दरातही 53 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा बंद भाव 67,460 रुपये होता. गुरुवारी तो 67,407 रुपयांवर बंद झाला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:32 PM, 16 Apr 2021
Gold Rate Today: लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीत तेजी, झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे भाव
Gold Rate Today silver rate

नवी दिल्लीः अमेरिकन बाँड यील्ड आणि डॉलरमधील घसरणीमुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Rate ) किंचित वाढ नोंदली गेली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचे दर 9 रुपयांच्या वाढीसह 46,431 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गुरुवारी त्याची किंमत 46422 रुपये होती. चांदीच्या दरातही 53 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा बंद भाव 67,460 रुपये होता. गुरुवारी तो 67,407 रुपयांवर बंद झाला. (Gold Rate Today: Gold Price 16 April 2021 Gold Silver Gained Before Wedding Season)

यील्ड बॉन्डचे उत्पन्न कमी झाल्याने सोन्यात वाढ

एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, यील्ड बॉन्डचे उत्पन्न कमी झाल्याने सोन्यात वाढ झाली. सध्या 10 वर्षाच्या अमेरिकन यील्ड बाँडचे उत्पन्न 1.57 टक्क्यांपर्यंत खाली आले. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया 58 पैशांच्या वाढीसह 74.35 वर बंद झाला. डॉलर निर्देशांकात स्थिर घसरण दिसून आली आणि 91.50 च्या पातळीवर व्यापार करत होता. या निर्देशांकामुळे जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद समोर आलीय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 11 डॉलरने वधारून 1777.80 डॉलर आणि चांदीचा भाव 0.23 डॉलर वाढीसह 26.19 डॉलर प्रति औंस पातळीवर बंद झाला. एका औंसमध्ये 28.34 ग्रॅम असते. एमसीएक्सवरही सोन्याची डिलिव्हरी भावात वाढ दिसून येत आहे. जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 43 रुपयांनी वधारून 47218 रुपये, तर ऑगस्टमध्ये सोन्याचा दर दहा ग्रॅम 57 रुपयांनी वाढून 47458 रुपये झाला.

चांदीची डिलिव्हरी किंमत

चांदीच्या डिलिव्हरी भावातही तेजी आहे. चांदीचा मे डिलीव्हरी भाव 289 रुपयांनी वाढून 68829 रुपये प्रतिकिलोवर गेला होता आणि जुलैच्या चांदीचा भाव 218 रुपयांनी वाढून 69830 रुपये प्रतिकिलो राहिला.

सोन्याची खरेदी-विक्री करण्यासाठी नवीन नियम लागू

1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात बीआयएसनेही याबाबत मागील महिन्यात एक अधिसूचना जारी केली होती. सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाईल. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट अशा या श्रेण्या आहेत.

भारत दरवर्षी सुमारे 700-800 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत, ज्वेलर्स बीआयएसच्या (BSI) ए अँड एच (A&H) सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि त्याची गुणवत्ता देखील तेथे तपासली जाते. या निकालानुसार, बीआयएस दागिने चिन्हांकित करते.

सोन्यामधील गुंतवणूक वाढली

कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवले.

संबंधित बातम्या

Gold rate today: लग्नसराईपूर्वीच सोनं पुन्हा एकदा महागलं, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold-Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? आजचे दर जाणून घ्या

Gold Rate Today: Gold Price 16 April 2021 Gold Silver Gained Before Wedding Season