नवी दिल्लीः गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold-Silver Rate) वाढ होत आहे. रुपयातील कमकुवतपणामुळे देशांतर्गत बाजारात सोने-चांदी महागले. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price) जोरदार उसळी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 587 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात तेजी दिसत होती. एक किलो चांदीची किंमत (Silver Price) 682 रुपयांनी वाढली. HDFC सिक्युरिटीजच्या मते, रुपयातील कमकुवतपणामुळे सोन्याला आधार मिळालाय. (Gold Rate Today: Gold Rises 7 April 2021 Due To Weak Rupee, Check The Latest Rates Gold Price Silver Price)
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 587 रुपयांनी वाढून 45,768 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,181 रुपयांवर बंद झाला होता.
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 682 रुपयांनी वाढून 65,468 रुपये झाली. मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रति किलो 64,786 रुपयांवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव गडगडला, तर चांदीमध्येही मंदी कायम राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,739 डॉलर आणि चांदी 25.34 डॉलर प्रति औंस होते. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरून 73.66 रुपयांवर आला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी COMEX (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा किमतीत किंचित घसरण होऊन 1,739 डॉलरवर व्यापार करत होते.
सोन्या-चांदीच्या सुरुवातीच्या कमकुवतपणानंतर फ्युचर्स मार्केटमध्येही तेजी दिसून आली. सायंकाळी 4.30 वाजता एमसीएक्स येथे जून वायदा सोन्याचा भाव 0.78 टक्क्यांनी म्हणजेच 359 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 46,278 रुपयांवर व्यापार करीत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात 38 टक्क्यांनी म्हणजेच 252 रुपयांची वाढ झाली. चांदीची किंमत 66,149 रुपये होती.
संबंधित बातम्या
Gold-Silver Price Today : दरवाढीच्या घोडदौडीला थोडीशी लगाम, सोने-चांदीचे आजचे दर काय?
Gold Rate Today: कोरोना महामारीमुळे सोने पुन्हा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Gold Rate Today: Gold Rises 7 April 2021 Due To Weak Rupee, Check The Latest Rates Gold Price Silver Price