Gold Silver Rate today: चांगली बातमी! Women’s Day लाच सोने झाले स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव

जागतिक मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर (Silver Rate) 587 रुपयांनी वधारले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत कलामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:00 PM, 8 Mar 2021
Gold Silver Rate today: चांगली बातमी! Women’s Day लाच सोने झाले स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव
Gold Silver Rate

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या (International Women’s Day 2021) दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचे भाव (Gold Rate Today) 122 रुपयांनी घसरले. सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली. जागतिक मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर (Silver Rate) 587 रुपयांनी वधारले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत कलामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ( Gold Rate Today Good News! Women’s Day Bribes Make Gold Cheaper; Quickly Check The Balance)

सोन्याची किंमत (Gold Price on 8 March 2021)

सोमवारी दिल्लीतील बुलियन मार्केटमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 44,236 रुपयांवरून 44,114 रुपयांवर घसरले. अशा प्रकारे सोन्याचे भाव 122 रुपयांनी कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅम 1,699 वर होते.

चांदीची किंमत (Silver Price on 8 March 2021)

जागतिक मागणीत वाढ झाल्याने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर 587 रुपयांनी वाढून 65,534 रुपयांवर गेले. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रतिकिलो 64,947 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति औंस 25.31 डॉलर होती.

सोने आठ महिन्यांत 12,086 रुपयांनी स्वस्त

यावेळी, ऑगस्ट 2020 च्या अखेरच्या उच्चांकाच्या तुलनेत सोने सुमारे 12,086 रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्टमध्ये ते 56200 च्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 522 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सच्या कमकुवततेमुळे 24 कॅरेट सोन्याच्या किमती दिल्लीत 122 रुपयांनी घसरल्या.

वायदा बाजारात सोन्याच्या किमती इतक्या खाली आल्या

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या किमतीही खाली आल्या. व्यापारादरम्यान एप्रिलमधील वायदा 0.75 टक्क्यांनी म्हणजेच 335 रुपयांनी घसरून सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 44,348 रुपये झाला. त्याचबरोबर मार्च वायदे चांदीचा भाव 332 रुपयांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून 65,935 रुपये प्रति किलो झाला.

यावर्षी सोने 63 हजार रुपयांच्या पातळीवर जाईल

तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ही परिस्थिती जास्त काळ राहील, असे त्यांना वाटत नाही. जगातील बर्‍याच शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारही वाढलाय. परंतु बाजारात चढउतारही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट्स जसजसा अधिक वाढत जातोय, तसतसे नफ्यातही जोखीम देखील वाढतेय. अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नंतर सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या सोन्याकडे वळतील. तसेच सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि ते पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असा अंदाज आहे की, जर सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63,000 रुपयांच्या पातळीवर जाईल.

सध्याच्या किमतीवर आपल्याला दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळू शकेल

गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग देखील संभ्रमात आहे. त्यांना सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करणे सुरक्षित आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे. सोन्यात दीर्घ मुदतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकताो? यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किमती सध्या घसरल्याची अनेक कारणे आहेत. यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना लसीच्या लसीकरण मोहिमेतील भरभराट, नवीन लसींबद्दलची चांगली बातमी आणि आर्थिक हालचालीतील वाढ आहे. सोन्याच्या किमतींवरही त्याचा परिणाम होत आहे आणि इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने सोने स्वस्त झाले. जर डॉलरची मागणी वाढत गेली तर सोन्याच्या किमतीवर दबाव येईल.

गुंतवणूकदार अधिक धोकादायक पर्यायांकडे वळतायत

कोरोना लसीकरण वाढल्यामुळे आर्थिक हालचालींना वेग आलाय. अशा परिस्थितीत लोक अधिक जोखमीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. यामध्ये इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. त्याच वेळी सोन्याच्या किमतीतील घसरण तात्पुरती आणि अल्पकालीन आहे. म्हणूनच सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत उत्कृष्ट नफा कमावू शकतात. याउलट इक्विटी तेजीत टिकण्यास फारसा वाव नाही. तर नफा कमावून लवकरच बाहेर पडणे हा एक चांगला पर्याय असू शकेल. तज्ज्ञांच्या मते, सोने जून 2021 पर्यंत प्रति औंस 1960 डॉलरला पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

इंटरनेटवरून शिका फक्त 5 गोष्टी; मग बघा कसे कमवाल पैसे

Gold rate today : गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 12 हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा ताजे दर

Gold Rate Today Good News! Women’s Day Bribes Make Gold Cheaper; Quickly Check The Balance