नवी दिल्लीः सोने-चांदीमध्ये (Gold and Silver) गुंतवणूक करणार्यांसाठी चांगली बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी एप्रिल सोन्याची वायदे (Gold Price Today) किंमत 48,000 रुपयांच्या खाली आलीय. त्याच वेळी मार्चच्या चांदीच्या वायद्याच्या किमतीत (Silver Price Today) 1 टक्क्याहून अधिक घसरण झालीय. MCX वरील एप्रिलच्या सोन्याच्या वायद्याच्या किमतीत 0.52 टक्क्यांची घसरण झालीय. (Gold Silver Latest Price On 11 February 2021 Gold Rate Delhi Mumbai Kolkata Indore)
गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील एप्रिलच्या सोन्याचे वायदे भाव 249 रुपयांनी घसरून 47,764 रुपये प्रति ग्रॅम झाले. यासह चांदीमध्येही घसरण झाली. मार्चच्या चांदीच्या वायद्याच्या किमती 1.02 टक्क्यांनी घसरून 68,224 रुपये प्रति किलो झाली. 10 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढउतार पाहायला मिळाले. एप्रिल सोन्याचा वायदा भाव 1,842.70 डॉलर प्रति औंसवर बंद झाले, तर मार्च चांदीचे वायदा भाव 27.08 औंसवर बंद झाले.
जानेवारीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF) मध्ये 625 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी मागील महिन्याच्या तुलनेत 45 टक्क्यांनी जास्त आहे. गुंतवणूकदारांना आशा आहे की, पुढे जाऊन सोन्याला चांगला बाजारभाव मिळेल.
AMFI च्या आकडेवारीनुसार, जानेवारीअखेर Gold ETF मधील गुंतवणूक 22 टक्क्यांनी वाढून 14,481 कोटी रुपयांवर गेली, जी डिसेंबरच्या अखेरीस 14,174 कोटी रुपये होती.
22 कॅरेट सोने : 46,900 रुपये
24 कॅरेट सोने : 47,900 रुपये
चांदीचे दर : 68950 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 46,900 रुपये
24 कॅरेट सोने : 47,900 रुपये
चांदीचे दर : 68950 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 46,900 रुपये
24 कॅरेट सोने : 47,900 रुपये
चांदीचे दर : 68950 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 46,900 रुपये
24 कॅरेट सोने : 47,900 रुपये
चांदीचे दर : 68950 रुपये (प्रतिकिलो)
बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली असून, किंमत 38 रुपयांनी घसरून 47,576 रुपयांवर आली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 47,614 रुपयांवर बंद झाला. चांदी 783 रुपयांनी घसरून 68,884 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात चांदी प्रति किलो 69,667 रुपये होते.
वर्ष 2020 मध्ये सोन्याने 30 टक्के चांगला परतावा दिला. यंदा त्याच्या सोन्याच्या दरावर दबाव आहे. गेल्या काही महिन्यांनंतर सोने आता दहा ग्रॅमसाठी दहा हजार रुपयांनी स्वस्त झाले. कोरोना कालावधीत जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीची गुंतवणूक केली. यामुळे त्याचे दर वाढू लागले आणि ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने दहा ग्रॅम 56191 रुपयांची पातळी गाठली होती. त्याचप्रमाणे चांदी देखील प्रति किलो 78000 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती.
संबंधित बातम्या
gold silver latest price on 11 february 2021 gold rate delhi mumbai kolkata indore