Gold Silver Price 19 July : आठवड्याच्या पहिल्याच दिवसांत सोन्यात तेजी तर चांदीत घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

नवा आठवडा सुरू झाला आहे आणि पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ (Gold Silver latest price) आणि चांदीची घसरण दिसून आली आहे.

Gold Silver Price 19 July : आठवड्याच्या पहिल्याच दिवसांत सोन्यात तेजी तर चांदीत घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
सोने हॉलमार्किंग

मुंबई : नवा आठवडा सुरू झाला आहे आणि पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ (Gold Silver latest price) आणि चांदीची घसरण दिसून आली आहे. आज सकाळी एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव 30 रुपयांनी वाढून 48083 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत. सकाळी 9:13 वाजता हा भाव 68 रुपयांच्या वाढीसह 48121च्या पातळीवर व्यापार करत होता. त्याचप्रमाणे ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48389 रुपयांच्या पातळीवर आले होते.

चांदीच्या किंमतीमध्ये आज घसरण दिसून येत आहे. सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 251 रुपयांनी घसरून 68068 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. त्याचप्रमाणे डिसेंबर डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 256 रुपयांच्या घसरणीसह 69399 रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात ऑगस्टमध्ये सोन्याच्या किंमतीत 135 रुपयांची वाढ झाली होती. चांदीबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या आठवड्यात 952 रुपयांची घसरण नोंदवली गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीला रेड मार्क

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यापारात सोन्यावर दबाव दिसून येत असून, तो रेड मार्कवर व्यापार करत आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,814.70 डॉलरच्या पातळीवर लाल रंगात होते. चांदी सध्या 0.81 टक्क्यांनी घसरत आहे आणि ती प्रति औंस 25.587 डॉलरच्या पातळीवर व्यापार करत आहे.

डॉलर निर्देशांक वाढला, बाँड यील्डवर दबाव

सलग तिसर्‍या व्यापार सत्रात डॉलर निर्देशांकात वाढ दिसून येत आहे. यावेळी डॉलर निर्देशांक 0.03% वाढून 92.718च्या पातळीवर होता. जगातील इतर सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे, हे या निर्देशांकातून दिसून येते. अमेरिकेच्या दहा वर्षांच्या बाँड यील्डमध्ये आज घट दिसून येत आहे आणि सध्या 1.32 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

तेलाचे उत्पादन वाढवण्याच्या निर्णयामुळे किंमतींवर दबाव

ऑगस्ट महिन्यापासून तेल उत्पादनाला वेग देण्यात येईल, असा निर्णय ओपेक प्लस देशांनी रविवारी घेतला. या निर्णयानंतर आज कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 0.71 डॉलरच्या पातळीवर 73.07 टक्क्यांनी घसरत आहे. ओपेक प्लस देशांनी असा निर्णय घेतला की ऑगस्ट महिन्यापासून दररोज 4 लाख बॅरल अधिक तेल तयार केले जाईल. दरमहा उत्पादनात दररोज 4-4 लाख बॅरलची वाढ होते आणि डिसेंबर महिन्यात सध्याच्या तुलनेत दररोज 20 लाख बॅरेल्स अधिकचे तेल उत्पादन केले जाईल.

(Gold Silver Price today on 19 July gold price hike)

हेही वाचा :

Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?

Petrol Diesel Price: पुढच्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

Published On - 11:07 am, Mon, 19 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI