Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं एक रुपयानं घसरलं; 4 मेट्रोतले भाव एका क्लिकवर

सोन्याच्या दरात मुंबईत एक ग्रॅमसाठी 1 रुपयाची, तर 10 ग्रॅमसाठी 10 रुपयांची घसरण झालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:26 AM, 25 Jan 2021
Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं एक रुपयानं घसरलं; 4 मेट्रोतले भाव एका क्लिकवर
सोने-चांदीचे दर

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात (Gold Silver Rate Today)चढउतार पाहायला मिळत आहेत. कोरोना लसीची बातमी आणि अमेरिकन अध्यक्षांच्या झालेल्या निवडीनंतर या घटनांचा सोन्यावर भावावर परिणाम झाल्याचं दिसून आलंय. आता सोन्याच्या भावातही 1 रुपयानं घसरण झालीय. सोन्याच्या दरात मुंबईत एक ग्रॅमसाठी 1 रुपयाची, तर 10 ग्रॅमसाठी 10 रुपयांची घसरण झालीय. (Gold Silver Price Today On 25 January 2021 Maharashtra Mumbai Pune Latest Rate And Updates)

मुंबईत 1 ग्राम सोन्याचा भाव 4933 रुपयांनी घसरून 4932 रुपये झालाय. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,330 रुपयांनी घसरून 49,320 रुपये झालीय. नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबईत हे भाव सारखेच आहेत.

MCX वरील सोन्याचा दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण

दुसरीकडे आज एमसीएक्सवरील सोन्याचा दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी कमी झालाय, परंतु यावेळी त्यात किंचित घट नोंदवली गेलीय. 5 फेब्रुवारीला डिलिव्हरच्या सोन्याचा दर 15 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्राम 49155 रुपये झालाय. एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा वितरण दर यावेळी 38 रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 49260 रुपयांच्या पातळीवर होता. आज सकाळी 4 रुपयांच्या घसरणीसह 49,294 रुपयांच्या पातळीवर सोने उघडले. गेल्या आठवड्यात त्याची बंद किंमत 49,298 रुपये होती. यावेळी चांदी वाढताना दिसत आहे. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा दर यावेळी 174 रुपयांच्या वाढीसह 66,816 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. आज सकाळी चांदीचा दर 254 रुपयांच्या वाढीसह 66,896 रुपयांच्या पातळीवर उघडला.

राज्यातील 4 मेट्रो शहरांतील भाव

मुंबई : 49,320
पुणे : 49,320
नागपूर : 49,320
नाशिक : 49,320

पाटणा, जयपूर, लखनऊ आणि सूरत येथे आज सोन्याचा दर

गुड रिटर्नच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम किंमत अनुक्रमे हैदराबादमध्ये 45940 रुपये, पुण्यात 48320 रुपये, अहमदाबादमध्ये 49430 रुपये, जयपूर आणि लखनऊमध्ये 48080 रुपये, पाटणामध्ये 48320 रुपये आणि सूरतमध्ये 49430 रुपये आहेत. सूरतमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50430 रुपये, पाटण्यात 49320 रुपये, लखनऊ आणि जयपूरमध्ये 52450 रुपये, अहमदाबादमध्ये 50430 रुपये, पुण्यात 49320 रुपये आणि हैदराबादमध्ये 50120 रुपये आहे.

संबंधित बातम्या

SBIची नवी योजना, एफडीतून मिळणार दुप्पट लाभ! 5 हजार रुपयांपासून करु शकता सुरुवात

राजस्थानात आयटीची सर्वात मोठी रेड, तळघरात सापडला कुबेराचा खजिना; 700 कोटी जप्त!

Gold Silver Price Today On 25 January 2021 Maharashtra Mumbai Pune Latest Rate And Updates