मुंबईः भारतात सोन्याला अनन्यसाधारण असं महत्त्वं आहे. जगभरात सुरू असलेलं कोरोनाचं लसीकरण आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यापासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळालेत. आता अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजची आंतरराष्ट्रीय बाजाराला अपेक्षा आहे. त्यामुळेच सोन्याच्या भावात चढउतार दिसून येत आहेत. बऱ्याचदा सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलतात, त्याचा परिणाम भारतातील बाजारावरही दिसून येतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबुतीवरही या किमती अवलंबून असतात. सोने-चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price Today On 26 January 2021 Maharashtra Mumbai Pune Latest Rate And Updates)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 320 रुपये
चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66700 रुपये (प्रतिकिलो)
100 वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. 1 तोळा सोनं हे 10 ग्रॅमच्या दशमान पद्धतीत बसवणं सहजसोपं जातं. त्यामुळे 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं ही पद्धत निश्चित केली गेली.
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.
संबंधित बातम्या
Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?
Gold Silver Price Today On 26 January 2021 Maharashtra Mumbai Pune Latest Rate And Updates