मुंबईः गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीला जास्त प्राधान्य देत आहेत. जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा सोन्याच्या किमतींवरही परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत झालेले सत्तांतर आणि कोरोना लसीकरणाच्या बातम्यांमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार (Gold Silver Rate Today) पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेल्या किमतींचा परिणाम स्थानिक बाजारांवरही दिसून येतो. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याचा परिणामही सोन्याच्या दरांवर होत असतो. विशेष म्हणजे सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांची घसरण झालीय. (Gold Silver Rate Today: Gold and Silver Cheap Again; These Are Today rates)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 320 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
100 वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. 1 तोळा सोनं हे 10 ग्रॅमच्या दशमान पद्धतीत बसवणं सहजसोपं जातं. त्यामुळे 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं ही पद्धत निश्चित केली गेली.
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.
संबंधित बातम्या
Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?
Gold Silver Rate Today: Gold and Silver Cheap Again; These Are Today rates