Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त; तोळ्याचा भाव काय?

सोन्याचे भाव खाली आले ,तर चांदी महाग झाली. चांदीचा भाव 151 रुपयांनी वाढून 69,159 रुपये झाला आहे. ज्याचा मागील बंद भाव 69,008 किलो होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:42 PM, 25 Feb 2021
Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त; तोळ्याचा भाव काय?
Gold Silver Rate Today

नवी दिल्लीः जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दरानं उच्चांक गाठलेला असतानाच राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे भाव (Gold Rate Today) 358 रुपयांनी घसरून 45,959 रुपयांवर गेले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. आधीच्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,313 रुपयांवर बंद झाले होते. सोन्याचे भाव खाली आले ,तर चांदी महाग झाली. चांदीचा भाव 151 रुपयांनी वाढून 69,159 रुपये झाला आहे. ज्याचा मागील बंद भाव 69,008 किलो होता. (Gold Silver Rate Today Gold Price Fall 358 Rupee Today)

दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किंमतीत 358 रुपयांची घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “जागतिक स्तरावर सोन्याची विक्री कमी झाल्याच्या अनुषंगाने दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किंमतीत 358 रुपयांची घसरण झाली.” आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,792 डॉलरवर घसरले. चांदी किंचित खाली 27.56 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

सकाळी किंमत काय होती?

गुरुवारी व्यापार सत्रात अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या भावावर दबाव सकाळपासूनच दबाव होता. सकाळच्या व्यापारात, एमसीएक्सवर सोन्याचे दर 46500 च्या पातळीवर होते. 5 एप्रिल रोजी एमसीएक्सवरील सोन्याचा भाव 79 रुपयांनी घसरून 46443 रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 19 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46696 रुपयांच्या पातळीवर होता.

सोने 56,500 च्या पातळीवर पोहोचू शकते

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या 1800 डॉलर्सच्या भक्कम स्थानावर आहे. मध्यम मुदतीत हे 2150 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, आयात शुल्कामध्ये 5% कपात केल्यामुळे सोन्याच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे, परंतु येत्या 6-12महिन्यांत ती 56500 किंवा त्याहून अधिक वर जाऊ शकते. कमोडिटी मार्केटचे तज्ज्ञ अजूनही म्हणतात की, किमतींमध्ये पुन्हा वाढ होईल, म्हणून ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.

22 ते 28 फेब्रुवारी सोन्याचा भाव काय राहील?

देशात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्यानं सोन्याच्या भावातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीकरण सुरू असले तरी त्याचा सोन्याच्या दरावर फारसा प्रभाव पडणार नसल्याचं जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीने व्यापार करतेय. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 8.86 डॉलरने घसरून 1,767.93 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. चांदीची किंमत 0.33 डॉलरने घसरून 26.66 डॉलरवर पोहोचली आहे. पण येत्या आठवड्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदीला भारतामध्ये मोठी पसंती आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास पोहोचले तरी नागरिक ते नक्कीच खरेदी करतील. लोक सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोन्याच्या किमती जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतात

भारतात सोन्याला मोठी मागणी आहे, परंतु त्याची किंमत जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. एकीकडे संपूर्ण जग वर्ष 2020 मध्ये कोरोना साथीशी दोन हात करत होते. तर दुसरीकडे सोनं सतत विक्रम नोंदवत होते. वर्ष 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर जागतिक पातळीवर सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली. खरं तर कोरोना महामारीमुळे, गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटपेक्षा सराफामध्ये जास्त गुंतवणूक केली. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता भविष्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

Gold Silver Rate Today Gold Price Fall 358 Rupee Today