PPF गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; व्याजदर वाढवणे आणि मॅच्युरिटी कालावधी घटवण्याच्या सूचना

SBI इकॉनॉमिस्टच्या मते, सरकारने पीपीएफसाठी लॉक-इन कालावधी 15 वर्षांहून कमी केला पाहिजे आणि गुंतवणूकदारांना पैसे काढण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. PPF investors

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:33 PM, 16 Apr 2021
1/5
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (Public Provident Fund) संदर्भात 2021 अर्थसंकल्पातून बरेच बदल करण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच पीपीएफमधून मिळणारी कमाई ही कररचनेअंतर्गत आणली गेली, आता त्याचा परिपक्वता कालावधी कमी करण्याविषयी बोलले जात आहे. SBI इकॉनॉमिस्टच्या मते, सरकारने पीपीएफसाठी लॉक-इन कालावधी 15 वर्षांहून कमी केला पाहिजे आणि गुंतवणूकदारांना पैसे काढण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
2/5
स्टेट बँकेच्या अर्थशास्त्रज्ञांनी लहान बचत योजनांवरील व्याज कमी करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. कोरोना साथीच्या काळातही सरकारने बचत योजनांचा व्याजदर न बदलण्याचा योग्य निर्णय घेतला. याशिवाय या योजना अधिकाधिक आकर्षक बनविण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण सूचनाही करण्यात आल्यात. यामधील एक सूचना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीशी संबंधित आहे.
3/5
पीपीएफमधील गुंतवणूकदारांच्या पैशांची सरकार हमी देते. स्वयंरोजगार लोकांना सेवानिवृत्तीची सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही एक दीर्घकालीन लघु बचत योजना आहे. एसबीआय अर्थशास्त्रज्ञ असे सुचवतात की, सरकारने प्रथम 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी कमी केला. सरकारने एका ठराविक वेळेतून पैसे काढण्याची परवानगी दिली पाहिजे. पीपीएफवरील व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. सध्या व्याज 7.1 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफवरील व्याजदर 8.5 टक्के आहे. सरकारने ईपीएफ आणि पीपीएफच्या व्याजदरामध्ये समानता ठेवावी, असंही अर्थशास्त्रज्ञ सुचवतात.
4/5
वर्ष 2021च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला करांच्या अंतर्गत आणले. नवीन नियमांतर्गत जर तुम्ही अडीच लाखांहून अधिक पीपीएफची गुंतवणूक केली, तर अतिरिक्त रकमेवरील व्याज उत्पन्न कराच्या अधीन असेल. परंतु वित्त विधेयक 2021 मध्ये त्याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली.
5/5
Kisan vikas patra
आता आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे. आपण त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास व्याज उत्पन्न करपात्र होईल. पीपीएफमधील गुंतवणुकीमुळे 80 सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर कपात होईल. व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असते आणि परिपक्वता देखील करमुक्त असते.