SBI, कोटक महिंद्रानंतर आता HDFC बँकेने गृह कर्जावरील व्याजदर केले कमी; जाणून घ्या…

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनंतर एचडीएफसीनेही गृह कर्जावरील व्याज कमी करण्याची घोषणा केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:01 PM, 3 Mar 2021
SBI, कोटक महिंद्रानंतर आता HDFC बँकेने गृह कर्जावरील व्याजदर केले कमी; जाणून घ्या...
Good News For Government Employees

नवी दिल्लीः रिअल इस्टेट क्षेत्राला केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळत आहे. या क्षेत्रात भरभराट झाल्यास अर्थव्यवस्थेला दुप्पट फायदा होऊ शकतो. रिअल इस्टेटमुळे अनेक क्षेत्रात मागणी वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. अशा परिस्थितीत देशातील खासगी आणि सार्वजनिक दोन्ही बँकांनी गृहकर्जातून लोकांना दिलासा दिलाय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनंतर HDFC नेही गृह कर्जावरील व्याज कमी करण्याची घोषणा केलीय. (Hdfc Cut Home Loan Interest Rate By 5 Bps After Sbi And Kotak Mahindra Bank)

गृह कर्जावरील व्याजदरात 5 बेसिस पॉईंटने कपात

एचडीएफसीने गृह कर्जावरील व्याजदरात 5 बेसिस पॉईंटने कपात केलीय. एचडीएफसीतील गृह कर्जाचे दर 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आलेत. एचडीएफसीच्या सध्याच्या कर्ज धारकांनाही कपातीचा लाभ मिळणार आहे. व्याजदर कपात 4 मार्चपासून लागू केली जाणार आहे. यापूर्वी स्टेट बँकेने व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर व्याजदर किमान 6.70 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेनेही 10 बेसिस पॉईंटद्वारे व्याज रात कपात केली. कोटक महिंद्राचा व्याज 6.65 टक्के आहे.

एसबीआयचं कर्ज 6.70% नी सुरू

एसबीआयने गृह कर्जात 70 बेसिस पॉईंट (0.70 टक्के) पर्यंत सूट जाहीर केली आहे. गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यांपासून सुरू होत आहे. सूट केवळ 31 मार्चपर्यंत मिळू शकते. अशा परिस्थितीत आपण कर्जाबद्दल विचार करत असाल तर या महिन्यात कर्ज घ्या. याशिवाय प्रोसेसिंग शुल्कामध्ये ग्राहकांना स्वतंत्रपणे 100 टक्के सूट मिळत आहे. व्याजदरावर किती सूट देण्यात येईल हे तुमच्या सिबिलच्या स्कोअरवर अवलंबून आहे. व्याज दर 6.70 टक्क्यांपासून सुरू होईल, जे 75 लाखांपर्यंतच्या गृह कर्जावर लागू आहे. उच्च गृह कर्जावर हे 6.75 टक्के आहे. आपण योनो अॅपच्या मदतीने अर्ज केल्यास आपल्याला स्वतंत्रपणे 5 बेसिस पॉईंटची सूट मिळेल.

कोटक महिंद्रानेही इंट्ररेस्ट रेट 10bps ने केला कमी

कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जाचे (Home Loan Interest) व्याज 0.10 टक्क्यांनी कमी केले. या मर्यादित मुदतीत कपात झाल्यानंतर व्याजदर खाली 6.65 टक्क्यांवर आला. या कपातीसह बँकेचा दावा आहे की, ते ग्राहकांना बाजारपेठेतील सर्वात कमी व्याजदराने गृह कर्ज देतील. विशेष ऑफर म्हणून ग्राहक 31 मार्चपर्यंत 6.65 टक्के दराने कर्ज घेण्यास सक्षम असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. हा नियम गृह कर्ज आणि बॅलन्स ट्रान्सफर दोन्हीवर लागू आहे.

संबंधित बातम्या

SBI कडून स्पेशल ऑफर, YONO अ‍ॅपद्वारे खरेदी केल्यास मिळणार 50 टक्क्यांपर्यंत सवलत

घर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ; स्वस्त गृह कर्जासह बरेच फायदे

Hdfc Cut Home Loan Interest Rate By 5 Bps After Sbi And Kotak Mahindra Bank