घर खरेदीदारांना सरकारचं मोठं गिफ्ट; आता मुद्रांक शुल्कासाठी लागणार फक्त एवढेच रुपये

येडियुरप्पा यांनी 2021-22 वर्षाचा कर्नाटक राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे 35 ते 45 लाख रुपयांपर्यंतच्या फ्लॅट खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:24 PM, 8 Mar 2021
घर खरेदीदारांना सरकारचं मोठं गिफ्ट; आता मुद्रांक शुल्कासाठी लागणार फक्त एवढेच रुपये
Good News For Government Employees

बंगळुरूः घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केलीय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 2021-22 वर्षाचा कर्नाटक राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे 35 ते 45 लाख रुपयांपर्यंतच्या फ्लॅट खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Home Buyers Karnataka Reduces Stamp Duty For Apartments Valued Between Rs 35 45 Lakh To 3 Percent)

किती बचत होणार

मुद्रांक शुल्कात कपात झाल्यानंतर 35 लाख रुपयांच्या फ्लॅट खरेदीदाराची 70,000 रुपयांची बचत होईल आणि 45 लाख रुपयांच्या घराच्या खरेदीवर 90,000 रुपयांची बचत होईल. तसेच येडियुरप्पा यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे की, सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात (GSDP) 2.6 टक्क्यांनी घट झालीय. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे जीएसडीपी घटली आहे.

महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात केली कपात

यापूर्वी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केली होती. रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये घर नोंदणीसाठीच्या मुद्रांक शुल्कामध्ये कपात केली होती. सप्टेंबर ते डिसेंबर 2020 पर्यंत मुद्रांक शुल्क 2 टक्के ठेवण्यात आला आणि जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत 3 टक्के मुद्रांक शुल्काचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्रात घर नोंदणीसाठी 5 टक्के मुद्रांक शुल्क फी भरणे आवश्यक होते.

कृषी क्षेत्रात वाढ

मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, सेवा आणि उद्योग क्षेत्रात 3.1 टक्के आणि सर्विसेज अँड इंडस्ट्री सेक्टरमध्ये 5.1 टक्क्यांनी घट झाली असली तरी कृषी क्षेत्रात 6.4 टक्के वाढ झाली आहे.

महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

महिला दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. यापैकी गृहलक्ष्मी या योजनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या योजनेनुसार राज्यात कोणतेही घर विकत घेतले जाईल तेव्हा त्या घराची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल. 1 एप्रिल 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले. आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय.

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

Home Buyers Karnataka Reduces Stamp Duty For Apartments Valued Between Rs 35 45 Lakh To 3 Percent