गृह कर्जावर दिलेली सूट SBI ने घेतली मागे! व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काबद्दल जाणून घ्या

बँकेने म्हटले आहे की, काही मर्यादित काळासाठी उत्सवाचा हंगाम पाहता गृह कर्जात थोडी सवलत देण्यात आली होती, ती आता मागे घेण्यात आलीय. Home loan rebate withdrawn by SBI

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:37 PM, 7 Apr 2021
गृह कर्जावर दिलेली सूट SBI ने घेतली मागे! व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काबद्दल जाणून घ्या
मुदत ठेवी ही भारतीयांची पसंती राहिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अंदाज आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5-5.2 टक्के राहील. हेच कारण आहे की, काही बँकांनी मागील काही काळामध्ये ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बॅंकेने (SBI) गृह कर्जांबाबत स्पष्टीकरण दिलेय. बँकेचे हे स्पष्टीकरण नुकतेच गृह कर्जावरील वाढीव व्याजदराबद्दल आहे. बँकेने म्हटले आहे की, काही मर्यादित काळासाठी उत्सवाचा हंगाम पाहता गृह कर्जात थोडी सवलत देण्यात आली होती, ती आता मागे घेण्यात आलीय. गृह कर्जावरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. (Home loan rebate withdrawn by SBI! Learn about interest rates and processing fees)

गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची चर्चा

एसबीआयने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत एसबीआय गृह कर्जाच्या व्याजदराविषयी बातम्या फिरत आहेत. बातमीत गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची चर्चा आहे. उत्सवाच्या हंगामात काही मर्यादित कालावधीसाठी व्याजात सवलत देण्यात आली होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत चालू होती. या तारखेनंतर व्याजदराची सूट मागे घेण्यात आली.

स्टेट बँकेचं स्पष्टीकरण

स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार, गृह कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी गृह कर्जावरील व्याजदर 6.95 टक्के होता आणि आता हा दर कायम ठेवण्यात आला असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेने महिला कर्जदारांना सवलत दिलीय. मागील महिन्यात स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले. म्हणजेच, आजपर्यंत गृहकर्ज घेत असलेल्या लोकांना प्रक्रिया शुल्क भरण्याची गरज नव्हती. सणासुदीच्या काळात लोकांच्या सोयी लक्षात घेऊन बँकेने ही मोठी घोषणा केली. आता ते मागे घेण्यात आले आहे. यासंदर्भात बँकेनेही आपले स्पष्टीकरण दिले असून, आधीच्या व्याजदराबाबत सविस्तर माहिती दिलीय.

आधी व्याज दर काय होता?

सणांच्या हंगामात स्टेट बँकेने 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 6.70% व्याजदर दिले. यापेक्षा 75 लाख ते 5 कोटी रुपयांच्या गृहकर्जात 6.75 टक्के व्याज जाहीर केले. यासह स्टेट बँकेने गृह कर्जाची प्रक्रिया फी पूर्णपणे माफ केली होती. स्टेट बँकेची ही ऑफर देशातील कोणत्याही बँकेच्या व्याजदराच्या दृष्टीने सर्वात कमी होती.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक

मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या दृष्टिकोनातून एसबीआय ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. देशातील सर्वात मोठे गहाणखत सावकार (mortgage lender) आहे, म्हणजेच ऐवज तारण ठेवण्याच्या बदल्यात कर्ज देणारी सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने विक्रमी 5 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जे दिलीत. गृह कर्ज बाजारात एसबीआयचा 34% वाटा आहे आणि सर्व बँकांमध्ये हा सर्वोच्च आहे.

देशातील सर्वात मोठी बँक

देशातील सर्व बँकांमध्ये स्टेट बँकेच्या सर्वाधिक 22 हजार शाखा आहेत. यात जवळजवळ 58 हजार एटीएम/सीडीएम नेटवर्क आणि 71 हजारांहून अधिक बीसी आऊटलेट्स आहेत. स्टेट बँकेत 8.5 कोटी इंटरनेट बँकिंग वापरकर्ते आहेत, तर सुमारे 2 कोटी मोबाईल बँकिंग वापरतात. एसबीआयने बाजारात होणारी स्पर्धा लक्षात घेऊन YONO (YONO) नावाचे एकात्मिक डिजिटल आणि जीवनशैली मंच सुरू केले. आतापर्यंत 7 कोटी 40 लाख योनो अॅप्स डाऊनलोड केले गेले. योनोवर 34.5 मिलियनहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज या अ‍ॅपवर 90 लाख लॉगिन उपलब्ध आहेत. यासह एसबीआयची डिजिटल मोहीम पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहे.

संबंधित बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार

आपला चेहराच असेल आता बोर्डिंग पास, ‘या’ 4 विमानतळांवर पेपरलेस बोर्डिंग सेवा सुरू

Home loan rebate withdrawn by SBI! Learn about interest rates and processing fees