नोकरी सोडून 8 हजार कोटींचा बिझनेस थाटला, कर्जामुळे नदीत जीव दिला; सीसीडीच्या मालकाबद्दल हे माहीत आहे का?

याच काळात म्हणजे 2017मध्ये आयकर विभागाने त्यांच्यावर 700 कोटींच्या कर चोरीचा आरोप केला. 2019पर्यंत कंपनी 6550 कोटींच्या कर्जाखाली होती. सिद्धार्थ यांनी 20 टक्के शेअर विकून 3200 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं.

नोकरी सोडून 8 हजार कोटींचा बिझनेस थाटला, कर्जामुळे नदीत जीव दिला; सीसीडीच्या मालकाबद्दल हे माहीत आहे का?
बिजनेसमैन रिटायर नहीं होते, बल्कि वो मरते हैं; 'सीसीडी'चं साम्राज्य कसं उभं राहिलं माहित्ये?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 9:29 AM

बंगळुरू: तुम्ही अनेकवेळा सीसीडी (CCD) म्हणजे कॅफे कॉफी डेमध्ये गेले असाल. घटकाभर बसलाही असाल. पण या सीसीडीच्या मालकाच्या संघर्ष आणि यशाची कहानी तुम्हाला माहीत आहे का? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ वडिलांच्या सांगण्यावरून सीसीडीच्या मालकाने स्टॉक एक्सचेंजमध्ये (stock exchange) नोकरी केली. या नोकरीत मन रमलं नाही. म्हणून परत आपल्या गावाला गेले आणि सीसीडी सुरू केली. देशभरात फैलावलेल्या या सीसीडीचा आज टर्नओव्हर 8 हजार कोटी आहे. सीसीडीचा मालक जर नोकरीच करत राहिला असता तर फक्त काही लाखाच्यावर त्यांची मिळकत गेली नसती. पण आपला स्वत:चा स्टार्टअप सुरू केल्याने आज ते हजारो कोटींचे मालक आहेत. या मालकाचं नाव आहे व्हि.जी. सिद्धार्थ.(VG Siddhartha)

व्हि.जी. सिद्धार्थ हे मूळचे कर्नाटकचे आहेत. सिद्धार्थ यांचे वडील गंगैया हेगडे चिकमंगलूर वेस्ट हिलस्टेशनच्या चहाच्या मळ्यांचे मालक होते. सिद्धार्थ यांनी मंगळुरू विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन केलं. शिक्षणानंतर त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र, त्यांनी नोकरी करावी असं वडिलांना वाटायचं.

हे सुद्धा वाचा

वडिलांचं ऐकून ते मुंबईला आले आणि त्यांनी 1983मध्ये स्टॉक एक्सचेंजशी संबंधित कंपनीत नोकरी सुरू केली. या ठिकाणी त्यांनी दोन वर्ष काम केलं. पण नोकरीत मन लागलं नाही. त्यामुळे काही तरी वेगळं करण्यासाठी ते परत मुंबईहून बंगळुरूला आले.

बिजनेसमैन रिटायर नहीं होते, बल्कि वो मरते हैं, हे त्यांचं ध्येय वाक्य होतं. बंगळुरूमध्ये त्यांनी एक सेक्युरिटी कंपनी सुरू केली. सिवान सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव होतं. ही कंपनी चांगली चालली होती. 1992मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा उघड झाला. त्यानंतर त्यांनी स्टॉकमध्ये लावलेला संपूर्ण पैसा काढला. त्यानंतर त्यांनी आपला कॉफीचा धंदा पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

सिक्युरिटी कंपनीतून होणाऱ्या नफ्यातून त्यांनी कॉफीचे बगीचे खरेदी केले. 1992पर्यंत त्यांनी कॉफीचे तीन हजार एकर बगीचे खरेदी केले. त्यानंतर त्यांनी कॉफी डे ग्लोबल लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली.

1995पासून त्यांनी कॉफीची पावडर विकण्याचं दुकान सुरू केलं. स्वत:चं स्पेशल आऊटलेट असावं म्हणून 1996मध्ये त्यांनी सीसीडी आऊटलेट सुरू केलं. त्याची सुरुवात त्यांनी दीड कोटी रुपयाने केली. करिअरच्या सुरुवातीला गुंवतणुकीसाठी त्यांनी हा पैसा साठवला होता.

बंगळुरूमध्ये जेव्हा त्यांनी पहिला सीसीडी आऊटलेट सुरू केला तेव्हा तिथे एका कॉफीची किंमत 25 रुपये होती. किंमत जास्त असली तरी या कॉफीचा चस्का लागलेल्यांनी मात्र या नव्या प्रयोगाला चांगलीच साथ दिली आणि सिद्धार्थ यांच्या व्यवसायाने गगन भरारी घेतली.

2002पर्यंत कंपनीने फायदा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 2015मध्ये सिद्धार्थ यांनी शेअर मार्केटमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीच्या शेअरची सुरुवातीची किंमत 328 रुपये होती. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिकच्या क्षेत्रातही हात आजमावला. पण त्याचा कंपनीवर वाईट परिणाम झाला. कंपन्या घाट्यात गेल्याने त्यांचं नुकसान झालं.

याच काळात म्हणजे 2017मध्ये आयकर विभागाने त्यांच्यावर 700 कोटींच्या कर चोरीचा आरोप केला. 2019पर्यंत कंपनी 6550 कोटींच्या कर्जाखाली होती. सिद्धार्थ यांनी 20 टक्के शेअर विकून 3200 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं. कर्जाच्या तणावामुळे 2019मध्ये सिद्धार्थ यांनी नेत्रावदी नदीत उडी मारून जीव दिला.

सिद्धार्थ यांच्या मृत्यू नंतर त्यांची पत्नी मालविका हेगडे यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. 31 डिसेंबर 2020मध्ये त्या कंपनीच्या सीईओ बनल्या. त्यांनी बऱ्याच प्रमाणात कर्ज फेडलं. तसेच कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्के वाढही झाली. सध्या देशभरात सीसीडीचे 1700 आऊटलेट आहेत. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, चेक गणराज्य आणि मलेशियातही आऊटलेट आहेत.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.