सणासुदीला तिकीट बुकिंग करण्यापूर्वीच Aadhaarला IRCTC खात्याशी करा लिंक; जबरदस्त फायदे

आपल्या अ‍ॅपला आधारशी (Aadhaar IRCTC Linking) जोडल्यास आपण एका आयडीच्या माध्यमातून 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करू शकता. आपण 6 ऐवजी 12 तिकिटे कशा बुक करू शकता, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

सणासुदीला तिकीट बुकिंग करण्यापूर्वीच Aadhaarला IRCTC खात्याशी करा लिंक; जबरदस्त फायदे

नवी दिल्ली ः सणासुदीत प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्याची तयारी करीत असतो, परंतु बर्‍याचदा तिकिटांचे बुकिंग न केल्यामुळे आपल्याला घरी जाणे शक्य होत नाही. जर आपण दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने घरी जाण्याचा प्लानिंग करत असाल तर आधीच तिकीट बुक करा. IRCTC अ‍ॅपद्वारे आपण तिकिट बुकिंग करू शकता. आपल्या अ‍ॅपला आधारशी (Aadhaar IRCTC Linking) जोडल्यास आपण एका आयडीच्या माध्यमातून 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करू शकता. आपण 6 ऐवजी 12 तिकिटे कशा बुक करू शकता, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. (How To Link Your Aadhaar With Irctc Account )

लिंक करण्याचे काय फायदे आहेत?

आपल्या IRCTC खात्याला आधार लिंक केल्यावर तिकीट बुक करणे सोपे होते. याशिवाय सर्वात खास गोष्ट म्हणजे लिंक केल्यावर तुम्ही आयडीसह महिन्याभरात 12 तिकिटं बुक करू शकता. त्याच वेळी जर आपल्या खात्याला आधारशी लिंक केलेले नसल्यास आपण केवळ 6 तिकीट बुक करू शकाल. ही एक अनिवार्य प्रक्रिया नसली तरी आपण आधार लिंक केलेले असल्यास अतिरिक्त लाभ घेऊ शकता.

IRCTC खात्याशी आधार क्रमांक कसा जोडायचा –

IRCTC वेबसाइट irctc.co.in वर भेट द्या.
तुम्हाला तेथे युजर आयडी व पासवर्ड द्यावा लागेल.
त्यानंतर माय प्रोफाइल टॅबमधील आधार केवायसीवर क्लिक करा
त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
ओटीपी एन्टर केल्यानंतर व्हेरिफाई ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर सबमिटवर क्लिक करण्यापूर्वी आधार नंबरची पडताळणी करा.
अशा प्रकारे प्रवासी आधार जोडल्याची करू शकतात पडताळणी
सर्वात आधी आपल्याला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जावे लागेल.
आता वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द सबमिट करा.
यानंतर प्रोफाइल विभागात ‘मास्टर लिस्ट’ वर क्लिक करा.
आधार कार्डावर असलेला आधार क्रमांक, जेंडर, जन्मतारीख यांसारखा प्रवाशांचा तपशील द्या.
त्यानंतर ते सबमिट करा.
पडताळणीनंतर तुम्हाला सत्यापित केलेले लिहिलेले दिसेल.

यंदा रेल्वेनं अनेक विशेष गाड्या सोडल्या

दिवाळी आणि छठ पूजा (diwali and chhath puja 2020) रोजी घरी जाणा-यांना अडचण उद्भवू नये म्हणून यावर्षी सणासुदीपूर्वी भारतीय रेल्वे अनेक विशेष गाड्या चालवित आहे. या सर्व गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2020 दरम्यान धावतील. या सर्व गाड्या उत्तर प्रदेश व बिहार तसेच देशातील इतर काही वेगवेगळ्या जिल्ह्यात जातील.

संबंधित बातम्या

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या, अन्यथा मिळणार नाही ट्रेनमध्ये प्रवेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *