‘या’ 5 बँकांमध्ये एफडी केल्यास मिळणार सर्वाधिक नफा, तुम्हालाही मिळेल फायदा

गेल्या काही वर्षात त्यावरील व्याजदरामध्ये घट झालीय, असे असूनही ही पसंतीची गुंतवणूक असूनही गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते. fixed deposit rates 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:08 PM, 3 May 2021
'या' 5 बँकांमध्ये एफडी केल्यास मिळणार सर्वाधिक नफा, तुम्हालाही मिळेल फायदा
fixed deposit rates 2021

नवी दिल्लीः मुदत ठेव ही किरकोळ गुंतवणूकदारांची नेहमीच पहिली पसंती राहिलीय. गेल्या काही वर्षात त्यावरील व्याजदरामध्ये घट झालीय, असे असूनही ही पसंतीची गुंतवणूक असूनही गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते. आता आपण 5 बँकांविषयी माहिती देणार आहात, ज्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देतात. (If you do FD in these 5 banks, you will get maximum profit, you will also get benefit)

येस बँक सध्या 3.50 ते 6.75 टक्के व्याजदर देते

येस बँक सध्या 3.50 ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. 7-14 दिवसांसाठीच्या एफडीवर 3.50%, 15-45 दिवसांसाठीच्या एफडीवर 4%, 46-90 दिवसांसाठीच्या एफडीवर 4.50%, 3-6 महिन्यांसाठीच्या एफडीवर 5%, 6-9 महिन्यांसाठीच्या एफडीवर 5.50%, 9-12 महिन्यांसाठीच्या एफडीवर 5.75 टक्के, 1-2 वर्षांसाठीच्या एफडीवर 6.25 टक्के, 2-3 वर्षांसाठीच्या एफडीवर 6.50 टक्के, 3-10 वर्षांसाठी 6.75 टक्के व्याज देण्यात येत आहे. हे व्याज 2 कोटींपेक्षा कमी रकमेचे आहे.

युनायटेड बँक ऑफ इंडिया

युनायटेड बँक ऑफ इंडिया 4-6.50 टक्के, इंडसइंड बँक 3-6.50 टक्क्यांपर्यंत, यूको बँक 3-6.50 टक्क्यांपर्यंत, युनायटेड बँक ऑफ इंडिया 4-6.50 टक्के आणि SBM बँक 3.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. युनायटेड बँक 7-60 दिवसांसाठी 4 टक्के, 61-90 दिवसांसाठी 4.50 टक्के, 91-180 दिवसांसाठी 5 टक्के, 181-269 दिवसांसाठी 5.75 टक्के. 270 दिवस ते 1 वर्षापर्यंत 6 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. 1 वर्षासाठी 6.50 टक्के, 1-2 वर्षांसाठी 6.25 टक्के, 2-3 वर्षांसाठी 6.25 टक्के, 3-5 वर्षांसाठी 6 टक्के आणि 5 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांकरिता 6 टक्के व्याजदर मिळत आहे. हा व्याजदर 2 कोटीपेक्षा कमी ठेवींसाठी आहे.

इंडसइंड बँक व्याजदर

इंडसइंड बँक 30 दिवसांसाठी 3% व्याज देत आहे. 31-45 दिवसांकरिता 3.40 टक्के, 46-60 दिवसांसाठी 3.75 टक्के, 61-90 दिवसांसाठी 4 टक्के, 91-120 दिवसांसाठी 4.25 टक्के, 121-180 दिवसांसाठी 4.50 टक्के, 181-210 दिवसांसाठी 5.25 टक्के, 211-269 दिवसांकरिता 5.50 टक्के, 270-1 वर्षांसाठी 5.75 टक्के, 1-3 वर्षांसाठी 6.50 टक्के, 36-61 महिन्यांसाठी 6.50 टक्के, 61 महिन्यांपेक्षा जास्त 6.25 टक्के आणि इंडस टॅक्स सेव्हर स्कीम जी पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी असलेली कर बचतीवर 6.50 टक्के परतावा देते.

संबंधित बातम्या

RBI ने ICICI बँकेला तीन कोटींचा दंड ठोठावला, जाणून घ्या ‘कारण’

एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत, मग ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा मोठा तोटा

If you do FD in these 5 banks, you will get maximum profit, you will also get benefit